भारतीय सैन्य दलात नोकरी मिळविण्याचे विविध पर्याय; जाणून घ्या पात्रता

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 27 September 2020

सैन्यात भरती होण्याचे विविध पर्याय आहेत, त्यासाठी लागणारी शैक्षणिक आणि शारिरीक पात्रता, कौशल्य, वयोमर्यादा याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत.   

देशातील बहुतांश तरुणाईची इच्छा भारतीय सैन्य दलात नोकरी करण्याची असते, सैन्यात करियर करणे प्रतिष्ठेचे मानले जाते. दर्जेदार लाईफस्टाईल, चांगली नोकरी, भरघोस वेतन, इतर सेवा सुविधा आणि देशसेवा करण्याची संधी, त्यामुळे तरुणाईचा कल सैन्यात भरती होण्याकडे असतो. सैन्यात भरती होण्याचे विविध पर्याय आहेत, त्यासाठी लागणारी शैक्षणिक आणि शारिरीक पात्रता, कौशल्य, वयोमर्यादा याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत.   

सैन्यदलात शिपाई भरती

भारतीय सेनेत ट्रेडमन, नर्सिंग असिस्टन, टेक्नीकल क्लर्क/ स्टोर किपर, जनरल ड्यूटी अशा विविध टेक्निशीयन आणि नोनटेक्निशियन पदाच्या जाहीराती निघतात, देशातील विभिन्न राज्यात दरवर्षी भरती प्रक्रीया सुरु होते, या जागा शिपाई पदाच्या असतात. joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर सर्व जाहीरातींची माहिती दिली जाते. शिपाई पदासाठी  ८ वी/ १० वी/ १२ वी/ आयटीआय/ नर्सिंग पात्रता लागतात. उमेदवाराचे वय १७.५ ते २३ दरम्यान असावे लागते.

सैन्यदलात हवलदार 

भारतीय सैन्यदलात हवलदार रँकसाठी सर्वेयर ऑटो कार्टो (इंजिनियरिंग) पदाची भरती केली जाते. त्यासाठी गणित आणि विज्ञान दोन विषय अनिवार्य असतात. बारावी किंवा बी. ए/ बी. एससी पास पात्रता लागते. उमेदवाराचे वय २० ते २५ दरम्यान असावे लागते. सेना हवलदार (शिक्षा) पदासाठी भरती केली जाते. त्यासाठी ग्रुप एक्समध्ये एम. ए/ एमएससी/ एमसीए/ बीसीए यासह बी. एड् पास असणारे उमेदवार अर्ज करु शकतात. त्याचबरोबर ग्रुप वायसाठी  बी. ए/ बीएससी/ बीसीए/ बीसीए (आयटी) पास उमेदवार अर्ज करु शकतात.

नायब सुबेदार

नायब सुबेदार आणि कॅटरिंग जेसीओ, धार्मीक शिक्षा पदासाठी बारावी पास किंवा हॉटेल मॅनेजमेन्ट डिप्लोमा लागतो. उमेदवाराचे वय २१ ते २७ दरम्यान असावे लागते. शिपाई, हवलदार आणि नयाब सुबेदार पदावर भरती होणारे उमेदवार पदोन्नतीद्वारे सुबेदार पदार्यांत पोहचतात. या वरील रँक वेगवेगळ्या पद्धतीने भरल्या जातात.

सेनेत लेफ्टीनेंट पदावर जाण्यााठी विविध पर्याय आहेत. एनसीसी स्पेशल, एसएससी, आईएमए, 10+2 टेक्निकल, एनडीए, जेएजी, टीजीसी, यूईएस, टीजीसी (शिक्षा) याद्वारे निवड केली जाते. लेफ्टीनेंट पदावर भरती झाल्यानंतर उमेदवार पदोन्नतीद्वारे जनरल पदापर्यात जाता येते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News