भरपुर खा! अॅक्‍टिव्ह व्हा; वजन वाढणार नाही

फिरस्ती
Thursday, 9 May 2019

वजन वाढण्यास दोन गोष्टी सगळ्यात जास्त कारणीभूत असतात. एकतर आपण खूप चिंताग्रस्त असतो तेव्हा आणि कामाचा व्याप आहे म्हणून ऍक्‍टिव्ह पण नसतो.

भारताची विविधता हेच सौंदर्य आहे. भक्तांच्या भावनेतून मिळतो तो प्रसादसुद्धा. महाराष्ट्रात आपल्याला गव्हाची खीर, आमटी, भात असा प्रसाद मिळतो. सुटले ना तोंडाला पाणी आणि काय आठवले ना सज्जनगड, गोंदवल्यासारखी तीर्थक्षेत्रं.

जोतिबाला गेलो की पुरणपोळी मिळते. तर सध्या मी जम्मूमध्ये असून तेथे प्रसाद म्हणून शिरा, राजमा आणि चावल असा प्रसाद मिळतो. मग जर मी माझ्या वजनाची खूप काळजी घेते आणि डाएटवर असेन तर मी ते खायचे की नाही? 

भारताच्या प्रदेशांमधील भाषेतील, खाण्याच्या प्रकारांमधील विविधतेमध्ये खरी मजा आहे आणि जिकडे जायचे तेथे त्यांचे पदार्थ खाण्यात तर फारच जास्त गंमत आहे. 

जम्मूमध्ये सगळे पदार्थ खूप जास्त लोणी घालून बनवतात. दाल मखनी, पनीर, राजमा आणि खूप जास्त भात पण खाल्ला जातो. म्हणजे काय तर फुल ऑन हाय कॅलरी डाएट. नाश्‍त्याला पराठे, जेवायला सोया, आलू मटार, चणे की दाल, हे सगळे पदार्थ संपूर्ण प्रथिनेयुक्त आहेत. त्यामुळे फिरून शरीराची होणारी झीज लगेच भरून निघते.

कर्बोदके प्रमाणात खा, भात खाताना थोडा खा. एखादीच रोटी किंवा एखादाच फुलका खा. त्याबरोबर भरपूर सॅलड घ्या. हा आहार पुरेशा प्रमाणात फायबरयुक्त आहे. रात्री स्टेटस अपलोड केला तेव्हा एका फ्रेंडने म्हटले की, हे सगळे खाऊन जाड होशील.

तर इथे एक गंमत आहे, की आपण फिरायला आलो की भरपूर व्यायाम करतो. उत्साहात असतो. इकडे तिकडे फिरल्यामुळे भरपूर पाणी देखील पितो. पचनाची प्रक्रियाही व्यवस्थित होते. 

वजन वाढण्यास दोन गोष्टी सगळ्यात जास्त कारणीभूत असतात. एकतर आपण खूप चिंताग्रस्त असतो तेव्हा आणि कामाचा व्याप आहे म्हणून ऍक्‍टिव्ह पण नसतो. फिरायला आलो की एकतर आपण उत्साही असतो आणि दुसरी गोष्ट आपण जास्त ऍक्‍टिव्ह असतो. झोप पण व्यवस्थित होते. त्यामुळे मन आणि शरीर दोन्ही प्रसन्न होते. 

कधी आहे तुमचा पुढचा सुटीचा प्लॅन? असेल तर तिथले खायचे लोकल फेमस फूड जॉइंट्‌स शोधून ठेवा आणि त्याबरोबर तुम्ही तिथे काय खेळणार, बघणार, ट्रेक करणार ते सुद्धा शोधून ठेवा.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News