'हडसर पर्वतगडावर' घुमल्या 'वंदे मातरम्‌च्या घोषणा'

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 3 January 2020

‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्‌च्या घोषणा देत’ ४ हजार ६८० फूट उंच हडसर उर्फ पर्वतगडावर ट्रेक  

 जुन्नर : एकीकडे नववर्षाच्या स्वागताला डीजेचा धिंगाणा, पार्ट्या सुरू असताना निसर्गप्रेमींनी ‘इको फ्रेंडली क्‍लब’च्या माध्यमातून हडसर तथा पर्वतगडावर ट्रेकिंग करून नववर्षाचे स्वागत केले.

नववर्षाचे स्वागत निसर्गाच्या सानिध्यात या संकल्पनेतून पुण्यासह सोलापूर, औरंगाबाद, लातूर, परभणी येथून आलेल्या तरुणासह ज्येष्ठांनी जुन्नर तालुक्‍यातील हडसर, शिवनेरी, नाणेघाट परिसरात निसर्गभ्रमंती केली. इको फ्रेंडली क्‍लबच्या सदस्यांनी मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीला भेट दिली. साखळदंड मार्गाने सर्व ट्रेकर किल्ल्यावर पोहचले. त्यानंतर ऐतिहासिक नाणेघाट परिसरात निसर्गाचा आनंद घेत येथील इतिहास जाणून घेतला.नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी बुधवारी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्‌च्या घोषणा देत’ ४ हजार ६८० फूट उंच हडसर उर्फ पर्वतगडावर सर्वांनी उत्साहाने ट्रेक केला. 

इको फ्रेंडली क्‍लबचे संस्थापक तथा वसुंधरा मित्र परशुराम कोकणे, कार्याध्यक्ष भाऊराव भोसले, शैक्षणिक समन्वयक संजीवकुमार कलशेट्टी, औरंगाबाद विभाग समन्वयक जगन्नाथ राऊत, पुणे विभाग समन्वयक महेंद्र राजे, लातूरचे समन्वयक डॉ. उत्तम देशमाने, महिला प्रतिनिधी सोनाली थिटे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पडला.या उपक्रमात अभिषेक दुलंगे, आदित्य बालगावकर, अमिता वाघमारे, ऐश्‍वर्या कदम, सनी वाघमारे, जालन्याचे विठ्ठल वानखेडे, दीपक वैद्य, लातूरचे डॉ. सतीश बंडगर, रजनीकांत जाधव, परभणीचे हेमंत देशमुख, मल्लिका पाटील, परिक्षित अगावणे, पुण्याच्या श्रद्धा राजूरकर, वेणुगोपाल कट्टा, ऋतुजा निराळे, मयूर अग्निहोत्री, प्रसाद मुगळे, चंद्रकांत जाधव, शुभम मिसाळ, सुनील कोनापुरे, वेणुगोपाल कट्टा, विवेक सस्ते आदी निसर्गप्रेमी सहभागी झाले.

सात ते ८० वर्षांचे गिर्यारोहक

दत्तात्रेय बुरटे हे ८० वर्षांचे सदस्य आणि सर्वांत लहान सात वर्षांची प्रणवी प्रसाद मुगळे यांनी सर्वांचा उत्साह वाढविला. निसर्गरम्य जुन्नर तालुका परिवाराचे प्रमुख, माजी सैनिक रमेश खरमाळे, त्यांचे सहकारी विनायक साळुंखे यांनी निसर्गभ्रमंतीमध्ये सहभागी झालेल्या सदस्यांना मार्गदर्शन केले

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News