झणझणीत वडा रस्सा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 1 March 2020
  • रविवार सुट्टीचा दिवस त्या दिवशी मस्त झणझणीत वडा रस्सा घ्यायचा आहे का मग वाट कसली पाहता आहेत  असा नाश्ता तुम्ही तुमच्या घरी करू शकतात. 

झणझणीत वडा रस्सा बाहेर मिळतो तसा तुम्ही तुमच्या घरी सुध्दा करू शकतात. त्यासाठी रविवार स्पेशल रेसिपी खास तुमच्यासाठी घेऊन येत आहे. 

साहित्य :- 

  • पाव किलो चना डाळ
  • चवीनुसार मीठ
  • कोथिंबीर 4 लहान चमचे
  • 2 कांदे
  • सुके खोबरे 2 मोठे चमचे
  • आले
  • लसूण 6 पाकळ्या
  • गरम मसाला 1 लहान चमचा
  • कांदा लसूण मसाला 1 चमचा किंवा गरम मसाला दीड लहान चमचा
  • लाल तिखट 1 लहान चमचा किंवा चवीनुसार

वडयाची कृती :-  

पाव किलो चना डाळ 6 ते 7 तास भिजत घालावी. 6 ते 7 तास चना डाळ भिजवून घेतल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावी. नंतर त्या मध्ये लाल तिखट, मीठ, हळद, कोथिंबीर घालून छान मिक्स करून तव्यावर त्याचे छान वडे बनवून फ्राय करावे शालो फ्राय.

ग्रेव्हीसाठी कृती :-

2 बारिक कापलेले कांदे, सुके खोबरे, लसूण तेलात ब्राउन होत पर्यंत परतवून घेणे पण परतवताना ते वेगवेगळे परतवावे. नंतर आले घालून मिक्सरला बारीक वाटून घ्या. तेल गरम करून मोहरी छान तडतडली की कढीपत्ता, हळद, हिंग घालून तयार मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्या. नंतर त्या मध्ये लाल तिखट, गरम मसाला, कांदा लसूण मसाला घालून परतवून घ्या. कोथिंबीर मसाला परततानाच घालावी बारीक चिरून घ्या. त्यानंतर हवे तेवढे गरम पाणी घालून घ्या. ग्रेव्हीला उकळी आली की, तयार वडे हळू हळूत्या ग्रेव्हीत घालावेत. रस्स्यात थोड पाणी जास्तच ठेवावे. त्यात चवीनुसार मीठ घालावे. वडे शिजत येतात तसे तसे ते पाणी शोषून घेतात. त्यामुळे ग्रेव्ही थोडी घट्ट होते आणि खूप पातळ रस्सा पेक्षा घट्टच ठेवावा. नंतर स्लो फ्लेम वर 20 ते 25 मिनिट शिजवून घ्या.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News