चटपटीत कणकेचा उत्तप्पा 

सकाळ वृत्तसेवा यिनबझ
Friday, 28 February 2020
 • कणकेचा उत्तप्पा सकाळच्या नाश्त्याला किंवा रात्रीच्या हलक्या जेवणाला उत्तम पदार्थ आहे. खूप सोपा घरी जे असते त्यातूनच बनवता येतो नक्की करून बघा.

साहित्य :-

 •  1/2 वाट्या कणीक 
 •  1/4 वाटी बेसन  
 •  1/2 वाटी बारिक रवा          
 •  1/2 वाटी ताक (आंबट नको) 
 •  1/2 वाटी बारिक चिरलेला कांदा  
 •  1/4 वाटी बारिक चिरलेली कोथींबीर
 • 1/2 वाटी कुठलीही कोरडी चटणी (दाण्याची किंवा खोबरे  लसूण) 
 • 1/2 टी स्पून तिखट 
 •  मीठ चवीनूसार

कृती :-

कणीक, रवा, बेसन, मीठ, तिखट आणि ताक सगळे एकत्र करून घ्यावे, हवे आसल्यास त्यात थोडे पाणी घालुन सरसरीत भिजवून ठेवावे. एक तासाने नॉनस्टिक तव्यावर उत्तप्पा घाला त्यावर कोरडी चटणी, कांदा, कोथींबीर घाला. त्यानंतर उत्तप्पाच्या कडेने थोडे तेल सोडा. उत्तप्पा जरा ब्राउन झाला की, उलटा करा आणि त्यानंतर लगेच काढून सर्व करा थोडे बटर किंवा लोणचे दिल्यास आणखीनच छान . 

टिप्स :-

 • कमीत कमी एक तास मिश्रण भिजवत ठेवावे ज्यास्त वेळ ठेवल्यास छान फूगतो उत्तप्पा.       
 • 3/4 तासांनी मात्रा ज्यास्त आम्बूस लागतो उत्तप्पा. 
 • आवडत असेल तर उत्तप्प्यात बारिक चिरलेला टोमटो, हिरवी मिरची घाला आणि जर हिरवी मिरची घातली तर मग तिखट घालू नका.       

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News