'छत्रपती मोदी जिंदाबाद' या उमा भारतींच्या ट्विटला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 February 2020

भाजप उपाध्यक्षा उमा भारती यांनी एक ट्विट करुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आणि 'छत्रपती मोदी जिंदाबाद' असं ट्विट केल

दिल्ली :विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने चांगलाच धुरळा उडवला. 70 पैकी 62 जागेवर विजय मिळवून एकहाती सत्ता मिळवली. भाजपला फक्त 8 जागांवर समाधान मानाव लागल. त्यामुळे 'आप'चा विजय भाजप नेत्यांना चांगलाच जिव्हाळी लागला आहे. भाजप उपाध्यक्षा उमा भारती यांनी एक ट्विट करुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आणि 'छत्रपती मोदी जिंदाबाद' असं ट्विट केल.

 

 

 

 

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मंगळवारी (ता.11) खासदार उमा भारतीने तीन ट्विट केले. 'दीड वर्षात विविध राज्यांमध्ये निवडणुका झाल्या. त्यानंतर लोकसभा आणि महिन्यांनी इतर राज्याच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासारखा सक्षम नेता दुसरा नाही असा निकर्ष या निवडणुकीत समोर आला. संपुर्ण देशातील जनतेने मोदीजींना आणि मोदीजींनी जनतेला आपलस केल. छत्रपती मोदी जिंदाबाद' असे ट्विट खासदार भारती यांनी केल. 

खासदार भारती यांच्या ट्विटचा नेटकऱ्यांनी चांगलाचं समाचार घेतला. अनेकांनी यावर टिका केली आहे तर काहीनी निषेध व्यक्त केला. उमा भारतींनी जनतेची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे 'छत्रपती मोदी जिंदाबाद' ट्विटचा वाद होण्याची शक्यता आहे. काही दिवासापुर्वी 'आज के शिवाजी नरेंद मोदी' या पुस्तकावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. पुस्तरावर जनतेनी प्रचंड प्रमाणात टीका केली होती. 'आज के शिवाजी नरेंद मोदी' हे पुस्तक सरकारने वापस घ्यावे' अशी मागणी केली होती.

छत्रपती शिवाजी महाराज एकला राजा, बाकी खेळ माकडाचा

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News