डेटिंग अॅप्स वापरतायं? घ्या 'ही' काळजी 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 15 March 2020
  • एखाद्या व्यक्तीची माहिती या अॅप्सच्या माध्यमातून चोरी होत असल्याचे देखील त्यांचं म्हणणं आहे.

आज तरुणाई मोठ्या प्रमाणात डेटिंग अॅप्स वापरत आहेत. आपल्याला हवा असणारा जोडीदार शोधण्यासाठी  सायबर सेक्युरिटी कंपनीच्या माहितीनुसार, हे अॅप्स सुरक्षित नाहीत. एखाद्या व्यक्तीची माहिती या अॅप्सच्या माध्यमातून चोरी होत असल्याचे देखील त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे हे अॅप्स वापरताना काळजी घेणं गरजेचं आहे. 

  • या अॅप्सच्या माध्यमातून व्यक्तिगत माहिती चोरण्याचं प्रमाण वाढतं. या अॅप्सच्या माध्यमातून आपली सर्व माहिती शेअर करणे टाळा. बहुतेक युजर्स आपले सर्व नाव आणि माहिती या अॅप्सवर शेअर करत असतात. तुम्ही 'डेट' करणार आहेत, त्याच व्यक्तीसोबत खात्री केल्यानंतरच आपली माहिती शेअर करा. 
     
  • ती व्यक्ती आणि तुमच्या असणाऱ्या आवडी-निवडी तपासताना तुमचे ओळखीचे असणारे मित्र-मैत्रिणी 'कॉमन' आहेत का, याची देखील माहिती घ्या.
     
  • त्या व्यक्तीबद्दल पूर्ण खात्री असेल तरचं तुमच्याबद्दल आणि घरच्यांनबद्दल त्या व्यक्तीला सांगा. 
     
  • व्यक्ती पूर्णपणे अनोळखी असेल तर शक्यतो 'डेट' करणं टाळा.
      
  • ज्यावेळी डेटिंग सुरु कराल त्यावेळी आपल्या मित्रपरिवाराचा आणि कुटुंबाचा सल्ला घ्या.
     
  • तुम्ही डेटिंग अॅप्स किंवा साईटचा वापर करताना मध्ये येणाऱ्या जाहिराती आणि 'पॉप्स अप' वर क्लिक करू नका. यामुळे तुमची माहिती लीक होण्याची शक्यता असते.
     
  • आज अनेक डेटिंग अॅप्स आहेत, त्यापैकी कोणते चांगले कोणते वाईट या अॅप्सची खात्री करून घ्या. त्याबाबत लोकांचे काय रिव्ह्यू आहेत, ते पाहा. त्यानंतरच निवड करा.
     
  • डेटिंग अॅप्सच्या माध्यमातून आपले खासगी फोटो आणि व्हिडीओ शेअर करणे टाळा. तसेच 'लाईव्ह चॅट' नाही कराल तेवढं चांगलं. 
     
  • हे अॅप्स वापरताना आपला वेगळा ईमेल आयडी तयार करा, जेणेकरून तुमच्या वैयक्तिक गोष्टी वेगळ्या राहतील. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News