इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांचं शेतीसाठी उपयुक्त अॅप; इस्त्रोने केले कौतुक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 August 2020

कॉलेजच्या माहिती आणि तंत्रज्ञान अभियांत्रिकी विभागामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी ही कामगिरी केली आहे.

इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांचं शेतीसाठी उपयुक्त अॅप; इस्त्रोने केले कौतुक

भारतात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. त्याचबरोबर प्रत्येक राज्यात मातीनुसार वेगळं उपयुक्त असं पीक घेतलं जातं. कोणत्या शेतीत कोणतं पीक घ्यावं आणि अन्य माहिती एका क्लिकवर पटकन उपलब्ध होईल असं अॅप इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी तयार केलं आहे. 'कॉपीफाय' असं या अॅपचं नाव असून शहा आणि अँकर इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांनी तयार केलं आहे. इस्त्रोकडून देण्यात आलेल्या समस्येवरती कॉपीफाय या अॅपनं 'स्मार्ट इंडिया हॅकेथॉन' स्पर्धेत चमक दाखवली आहे. त्यामुळे इस्त्रोने विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

कॉलेजच्या माहिती आणि तंत्रज्ञान अभियांत्रिकी विभागामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी ही कामगिरी केली आहे. शेवटच्या वर्षातील शिक्षण घेणा-या विद्यार्थींनी ही मोहीम यशस्वी केली असून त्यांची नावे निशित मिस्त्री, ख्याती प्रजापती, विरती पारेख, पार्थ जोशी, चार्मी संघवी आणि निल शाह अशी आहेत.

हे ॲप तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना पॉब्लेम स्टेटमेंट इस्त्रोनं दिलं होतं. गुजरात टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, अहमदाबाद या नोडल सेंटरला इस्रोनं दिलेल्या प्रॉब्लेम स्टेटमेंटकरीता अॅप तयार करण्याचं काम दिलं होतं. ते शहा आणि अँकर इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांनी तयार केलं. या अॅपला प्रथम क्रमांक मिळाल्याने इस्त्रोने विद्यार्थ्यांना ७५ हजार रूपयांचं बक्षीस सुध्दा दिलं आहे.

तयार केलेल्या अॅपविषयी

पिकांच्या काढलेल्या फोटोवरून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून पिकांकरीता लागणार हवामान आर्द्रता आणि पाणी ही सगळी माहिती अॅपमध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर फोटोवरून हे पीक कशाचे आहे, याची माहिती ओळखण्याची क्षमता सुध्दा अॅपमध्ये असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे. भारतात विविध राज्यात कोणती पिकं घेतली जातात त्याची माहिती सुध्दा त्या अॅपमध्ये आहे.

मागच्यावर्षी आम्ही दोन्ही परीक्षेत भाग घेण्याकरीता अनेक प्रयत्न केले. परंतु तिथं आमची निवड झाली नाही. म्हणूनच आमच्या टिमने ही स्पर्धा जिंकण्याचं ध्येय ठेवलं होतं. पाहिलेलं स्वप्न आम्हाला नेहमी प्रेरणा देण्याचं काम करत होतं. आमची टीम आणि मार्गदर्शक शिक्षक यामुळे ही स्पर्धा आम्ही जिंकू शकलो - निश्चित मिस्त्री

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News