सजावटीसाठी कुंड्यांचा वापर - संतोष जुवेकर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 3 September 2019

एका कृत्रिम तलावात आम्ही बाप्पाचे विसर्जन करतो. दीड दिवसाचा गणपती असल्याने आमच्या घरी बरेच पाहुणे येतात. गणेशोत्सवाच्या निमित्ताने घरातल्यांना आणि पाहुण्यांना वेळ देता येतो. 

दरवर्षी गणेशोत्सवाचा एक वेगळाच आनंद असतो. या उत्सवाची मी आतुरतेने बाप्पाची वाट पाहत असतो. त्यामुळे माझ्यासाठी हा सण खूपच स्पेशल आहे. माझ्या डोंबिवलीच्या घरी दीड दिवसासाठी बाप्पा विराजमान होतात. प्रत्येक गणेशोत्सव आम्ही अगदी इको-फ्रेंडली पद्धतीने साजरा करतो. बाप्पाची मूर्ती शाडूच्या मातीची बनलेली असते. सजावटदेखील इको-फ्रेंडलीच करतो. या वर्षी सजावटीसाठी आम्ही वेगवेगळ्या रोपांच्या कुंड्या वापरणार आहोत.

सजावटीची जबाबदारी माझ्या घरच्यांकडे असते. मला शूटिंग नसेल तर मीसुद्धा थोडा हातभार लावतो. गणपतीच्या पहिल्या दिवशी आम्ही गुरुजींना बोलावून बाप्पाची प्रतिष्ठापना करतो. त्यानंतर पूजा आणि आरती होते. एका कृत्रिम तलावात आम्ही बाप्पाचे विसर्जन करतो. दीड दिवसाचा गणपती असल्याने आमच्या घरी बरेच पाहुणे येतात. गणेशोत्सवाच्या निमित्ताने घरातल्यांना आणि पाहुण्यांना वेळ देता येतो. 

तसेच आमच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला देखील वेळ देता येतो. या सणामुळे अनेक लोकांशी भेटीगाठी झाल्याने जवळिक आणि आपुलकी वाढते. मला असं वाटतं, की उत्सवाच्या नावाखाली जे मोठमोठे स्पीकर लावले जातात, बरेच फटाके लावून प्रदूषण केले जाते, तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बरेच जण आणतात, हे कुठेतरी थांबवायला हवे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News