जाणून घ्या, USB कंडोम खरच आपल्याला गरजेचा आहे का?

यिनबझ टीम
Monday, 9 December 2019

जगामध्ये कोणती गोष्ट व्हायरल होईल याचा काही नेम नाही, सोबतच कोणत्या प्रोडक्टला काय नाव दिलं जाईल, याचा अंदाज बांधणेही चुकीचा ठरेल.

जगामध्ये कोणती गोष्ट व्हायरल होईल याचा काही नेम नाही, सोबतच कोणत्या प्रोडक्टला काय नाव दिलं जाईल, याचा अंदाज बांधणेही चुकीचा ठरेल. सध्या अशाच एका प्रोडक्टची चर्चा खूप रंगताना दिसत आहे. त्यामुळे यावर आपणही बोलणं तितकच गरजेचं आहे. सध्या देशात USB Condom ची मागणी खूप वाढत चालली आहे, कारण त्याच कामही त्याप्रकारे आहे, हे नक्की. 

आपण काहीवेळा प्रवासामध्ये किंवा इतर कामाच्या ठिकाणी आपला फोन चार्जसाठी कुठल्याही युएसबी कनेक्टरला जोडत असतो किंवा कुठल्याही पोर्टला आपला फोन बिनधास्तपणे चार्जिंगला लावत असतो. काहीवेळा फोन चार्ज करत असताना आपल्या फोनमध्ये असलेला डेटा चोरीला जाण्याची शक्यता असते, काहीदा असे प्रकार होतातही. हे सगळं रोखता यावं म्हणून USB Condom नावाचा प्रकार समोर आला आहे.

आपण एखाद्या पोर्टला चार्ज करत असताना संबंधीत डेटा केबलच्या आधी हे USB Condom लावणे गरजेचे आहे, त्यामुळे आपल्या फोनचा आणि संबंधीत चार्जिंग पोर्टचा फक्त इलेक्ट्रिक करंटसाठी संबंध राहिल, बाकी आपल्या फोनमधून कोणीही कोणतीही फाईल चोरू शकत नाही.

काहीदा अनेक हॅकर्स एखाद्या चार्जिंग पाईंटजवळ आपली डेटा केबल ठेवून जातात आणि आपण त्याचवेळी ती डेटा केबल कोणतही तपासणी न करता आपल्या फोनशी कनेक्ट करतो, त्यामुळे आपला फोन चार्जिंग होत असतोच, सोबतच आपल्या फोनमधल्या file  संंबंधीत डेटा केबलच्या माध्यमातून चोरी होऊ शकतात.

त्यामुळे USB Condom हे एक उपकरण आहे, ज्याचा मोबाईलच्या डेटा केबलला जोडण्यासाठी वापर केला जातो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News