अशी करा किचनची झटपट स्वच्छता 

शेफ स्वप्नील 
Wednesday, 27 March 2019

स्वयंपाक झाल्यावर किचन स्वच्छ करणं म्हणजे अतिशय कंटाळवाणं काम आहे. मात्र ते करणंदेखील तितकंच आवश्‍यक आहे, म्हणूनच तुम्ही तुमचं किचन झटपट कसं स्वच्छ कराल हे जाणून घेऊ.

स्वयंपाक झाल्यावर किचन स्वच्छ करणं म्हणजे अतिशय कंटाळवाणं काम आहे. मात्र ते करणंदेखील तितकंच आवश्‍यक आहे, म्हणूनच तुम्ही तुमचं किचन झटपट कसं स्वच्छ कराल हे जाणून घेऊ.

  • चहा पावडर पाण्यात उकळून घेऊन त्या पाण्याने गॅसची शेगडी पुसल्यास ती एकदम स्वच्छ होते. त्यामुळे साचलेले चिकट पदार्थ पटकन निघतात. 
  • एका जारमध्ये संत्र्याच्या साली, व्हिनेगर घालून थंड जागी काही आठवड्यांसाठी ठेवून द्या. त्यानंतर हे मिश्रण एका स्प्रेच्या बाटलीत घेऊन त्याच्या दुप्पट पाणी घ्या. व्यवस्थित ढवळून घ्या. या पाण्याने गॅसची शेगडी आणि सिंक धुऊन घ्या. 
  • ओव्हन खराब झाला असल्यास तो स्वच्छ कसा करायचा हा प्रश्‍न असतो. म्हणूनच ओव्हन गरम असतानाच ओव्हनच्या आतल्या वरील बाजूला थोडंसं मीठ टाकावं. म्हणजे वर चिकटपणा सहज खाली पडतो. हा चिकटपणा कपड्याने तुम्ही पुसून घेऊ शकता. 
  • स्टीलच्या वस्तू घरात छान दिसतात; मात्र त्या लवकर खराबदेखील होतात. नळ, बेसिन आदी गोष्टी स्वच्छ करायच्या असतील तर एखादा स्पंज किंवा टॉवेलवर वोडका घेऊन त्याने स्वच्छ केल्यास त्या वस्तू छान चमकतील. 
  • वर सांगितल्याप्रमाणे बेसिन स्वच्छ केल्यावर ते बेबी ऑईल किंवा ऑलिव्ह ऑईलने स्वच्छ केल्यास ते नव्याप्रमाणे दिसतं. 
  • शेगडीवर बर्नरच्या आजूबाजूच्या भागावर कित्येक चिकट डाग जमा होतात. ते घालवण्यासाठी ते गरम असतानाच ते साबणाच्या पाण्याने पुसून घ्यावेत म्हणजे पटकन निघतात. 
  • कधी कधी स्वयंपाक झाल्यावरही काही वेळ मसाल्याचा किंवा अंड्याचा दुर्गंध तसाच राहतो. हा दुर्गंध घालवण्यासाठी एक लिंबाला छिद्र करून ते ओव्हनमध्ये २०० डिग्री सेल्सिअसला पंधरा मिनिटं तापवा. नंतर ओव्हनचा दरवाजा हळूच थोडासा बाजूला करा. लिंबाचा ताजातवाना सुगंध संपूर्ण परिसरात पसरेल. किंवा एक लिंबू पाण्यात घालून ते उकळल्यानेदेखील घरातील दुर्गंधी कमी होईल. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News