उन्हाळ्यात घामाची दुर्गंधी घालवण्यासाठी हे खास परफ्यूम वापरा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 2 April 2019

एप्रिल महिना सुरु झाला असून बाहेर कडक उन्हाचा ताप असतो, तर शरीरातून निघणाऱ्या घामाच्या दुर्गंधीचा प्रचंड त्रास होतो. त्यामुळे आपण बऱ्याचदा दुर्गंधीचा निपटारा करण्यासाठी परफ्यूम वापरतो. बऱ्याचदा चांगला सुगंध यावा म्हणून महागडे ब्रँडेड परफ्यूमही खरेदी करतो. पण फक्त महागडा परफ्यूम खरेदी करून तुम्ही घामाची दुर्गंधी घालवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला काही खास गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल. 

फ्रेश सुगंध असणारा परफ्यूम वापरा
परफ्यूम हे सीजनल असतात. त्यामुळे उन्हाळ्यात फ्रेश सुगंध असणाऱ्या परफ्यूमची निवड करा. कारण ते त्या सीजनशी जुळूनही येईल. तसंच त्याच्या वापराने तुम्हालाही फार रिलॅक्स वाटेल 

महिलांसाठी परफेक्ट परफ्यूम 
महिलांसाठी कॅण्डी, फ्रूट आणि फ्रेश फ्लोरल सुंगधाचे परफ्यूम हे अगदी परफेक्ट आहेत. कॅण्डी आणि फ्रूट हे परफ्यूम दिवसा योग्य आहेत. तर नाईट पार्टीसाठी फ्लोरल परफ्यूम अतिशय योग्य आहेत. 

मस्क आणि सायट्रस परफ्यूम पुरुषांसाठी योग्य 
पुरुषांनी दिवसा सायट्रस फ्रूटसचे परफ्यूम वापरले पाहिजे. तर रात्रीच्या वेळेस मस्क आणि स्पाइसी परफ्यूमचा वापर केला पाहिजे. 

जास्त वेळ सुंगध देणारे परफ्यूम
परफ्यूम घेताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की, तुम्ही जो परफ्यूम वापरणार आहात तो जास्तीत जास्त वेळ सुगंध देणारा असावा. त्यामुळे आपण हवं तर लव्हेंडर, व्हॅनिला किंवा जॅस्मिन असेही परफ्यूम वापरू शकता. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News