पावसाळ्यात या चप्पलचा करा वापर आणि रहा फॅशनेबल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 17 July 2019
  • या सॅंडलमध्ये निऑन, फ्लोरोसंट कलरच्या सॅंडल तरुणाईच्या जास्त पसंतीस पडत आहेत.
  • या सॅंडल पिवळा, लाल, गुलाबी व निळा या रंगांमध्ये सुद्धा बाजारात मिळतात. या सॅंडलची किंमत कमीतकमी 100 रु इतकी आहे.

आजची तरुणाई दिवसेंदिवस फॅशनेबल होत आहे. आणि  फॅशन  करायला प्रत्येकाला आवडत. पण पावसाळ्याच्या दिवसात फॅशनेबल राहण  सहसा जमत नाही. आपण आपल्या कपड्याच संरक्षण छत्री किंवा रेनकोट वापरुन करू शकतो . पण आपल्या चप्पलच काय ? पावसाळ्यात  आपल्याला कितीही पाऊस असला कितीही चिखल असला तरी आपल्याला बाहेर हे पडावच लागल. आपण कितीही चप्पल सांभाळण्याचा  प्रयत्न  केला तरी ती घाणच होते.

पावसाळ्यात उंच टाचेच्या चप्पला घालणं शक्य नसत. त्यामुळे काहीजण तर फॉर्मल शूज ऑफिसमध्येच   ठेवतात आणि नंतर तिकडे गेल्यावर घालतात आणि घरातून बाहेर पडताना साध्या पावसाळी  चप्पलचा वापर करतात. त्यामुळे नक्की पावसात कोणत्या चप्पलचा वापर करायचा हा प्रश्न पडतो. यासाठी बाजारात आता रबर व प्लॅस्टिकच्या वेगवेगळ्या फॅन्सी पावसाळी चपला बाजारात आल्या आहेत. 

टी-स्ट्रॅ़प सॅंडल तुम्ही हे नाव कधी ऐकलंय का? या सॅंडल पावसाळ्यात फॉरमल ते कॅज्युल अशा कोणत्याही पेहरावावर वापरु शकतो. लिंकींग रोड, फॅशन स्ट्रिट, कॉजवे मार्केट या ठिकाणी या सॅंडल उपलब्ध आहेत. या सॅंडलमध्ये निऑन, फ्लोरोसंट कलरच्या सॅंडल तरुणाईच्या जास्त पसंतीस पडत आहेत. तसेच या सॅंडल पिवळा, लाल, गुलाबी व निळा या रंगांमध्ये सुद्धा बाजारात मिळतात. या सॅंडलची किंमत कमीतकमी 100 रु इतकी आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News