चमकदार आणि चिरतरुण सुंदर दिसण्यासाठी 'हे' वापरा

सकाळ वृत्तसंस्था (यिनबझ टीम)
Saturday, 23 March 2019

मिष्टी चक्रवर्तीची अदा प्रस्तुत करणार्‍या आपल्या नव्या जाहिरात उपक्रमाद्वारे विको सौंदर्याची परिसीमाच बदलते.

वैयक्तिक देखभाल क्षेत्रात अग्रगण्य स्थानी नेतृत्व करणार्‍या विको उद्योग समूहाने नुकतेच आपल्या नव्या जाहिरात उपक्रमाच्या पदार्पणाची घोषणा केली. या उपक्रमात मिष्टी चक्रवर्तीची प्रमुख अदाकारी व विकासाच्या दिशेने अग्रेसर असणारी मल्टि-चॅनेल जाहिरात यात समाविष्ट आहे; तसे पाहू गेल्यास मिष्टी चक्रवर्तीची ओळख तर विको गर्ल म्हणूनच आहे असे म्हणायला हरकत नाही. ती या जाहिरातीत आपले सौंदर्य अतिशय साकार आणि निर्विवादपणे साजरी करतांना दिसून येईल.

आपल्या शुध्द व प्रदूषणविरहित तसेच नैसर्गिक उत्पादनांतून ग्राहकांना अधिक मूल्य प्रदान करण्याच्या विकोच्या दृढ संकल्पास ही जाहिरात मोहिम अधिक बळकटी देते. ही जाहिरात विकोच्या अस्तित्वाचे सार सहजपणे प्रकट करते. ग्राहकांनी स्वत: निकोप रहण्यासाठी “संपूर्ण नैसर्गिक”चा अंगिकार करावा आणि रसायनांपासून बनवण्यात येणार्‍या हानिकरक उत्पादनांपसून दूर रहावे या साठी सदोदित प्रयत्नशील असणार्‍या कंपनीचे प्रतिक म्हणजे हा उपक्रम. ही जाहिरात आणखी नूतन अन तरोताजे पॅकिंग देखील प्रदर्शित करते जे ग्राहकास हवेहवेसे वाटेल अन त्याला प्रसन्न करेल.
ही जाहिरात मोहिम, चिकित्सेवर आणि बरे करण्यावर भर देणार्‍या दोन कार्यपध्दती अचूकपणे प्रस्तुत करते ज्यातून ग्राहकाचे “चकाकीदार अन चिरतरुण शरीर” प्रतित होते आणि त्या बरोबरच त्वचेच्या सामान्य समस्यांचा इलाज देखील सापडतो. “तुमचा खुलून दिसणारा चेहरा” या बिरुदास पात्र असणार्‍या तुमच्यासाठी हा एक परवडण्याजोगा उपाय आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर हा दोन क्रांतिकारक उत्पादनांचा संच आहे जी परस्परपूरक तत्त्वांवर काम करत एकत्रपणे प्रभावी संगम साधतात आणि दोन्ही मिळून अत्यंत गुणकारी ठरतात.

विको टर्मरिक फोम बेस क्रीमने आपला चेहरा धुतल्यानंतर आणि त्या नंतर विको टर्मरिक क्रीम लावल्याने तुमच्या त्वचेवर जादुई परिणाम होतो कारण त्यांत रोगाणुप्रतिबंधक आणि वाढत्या वयाचा प्रभाव कमी करणारे घटक असतात. ते केवळ तुमच्या चेहर्‍यावरील डाग, पुरळ व मुरुम यांचा नायनाट करतात एवढेच नसून त्या मुळे तुमच्या चेहर्‍यावर चमकदारपणा सुध्दा येतो. या व्यतिरिक्त तुमचा चेहरा धुतल्यानंतर विको टर्मरिक क्रीम लावल्याने तो चमकदार तर बनतोच परंतु त्या बरोबरच त्वचा तरोताजी, मृदू आणि झळकणारी बनते.

या मागील संकल्पना समजावून सांगतांना विकोचे संचालक श्री संजीव पेंढारकर म्हणतात, “ विको लॅब्जच्या प्रवासातील या पुढच्या टप्प्यावर आम्ही उत्तेजित आहोत आणि आमचे लक्ष आमच्या मूलभूत संकल्पावर आहे,आम्ही नेहमीच अस्सलपणा आणि नाविन्य यावर भर दिला आहे. ही जाहिरात केवळ उत्पादनासंबंधी नसून विकोच्या रगरगात भिनलेल्या मूलभूत मूल्यांबाबत आमची वचनबध्दता ,ती अधिक बळकटपणे व्यक्त करते. कोणत्याही उठून दिसणार्‍या उत्पादनाच्या पाठीशी अस्सलपणा आणि प्रभावीपणा असतो आणि आमची उत्पादने सुध्दा याचेच प्रतिक आहेत. आमच्या उत्पादनांचे नवीन डिझाईन व पॅकेजिंग देखील विकोच्या मूलभूत मूल्यांचेच प्रतिनिधित्व अधिक प्रभावीपणे करतात.”

ते पुढे म्हणतात,” आपल्या पुरातन ग्रंथांतील उत्पादनक्रिया आणि त्यांची आम्ही आधुनिक विज्ञानाशी घातलेली जोड यामुळे आम्हाला मिळालेले परिणाम आश्चर्यजनक आहेत. जाहिरातीत दाखवलेली ही दोन अतिविशिष्ट उत्पादने या आश्चर्यजनक परिणामांचे द्योतक आहेत. त्यांच्या एकत्र वापराने अत्यंत उत्तम संतुलन साधले जाते आणि विस्मयकारी परिणाम दिसून येतात.”

मिष्टीबद्दल बोलतांना ते म्हणतात,” आमचा मिष्टीसोबत असणारा सहयोग दीर्घकालिन आणि दोन्ही बाजूंस सुखावणारा आहे. तिचे आमच्याशी संलग्न असणे ही आम्हासाठी आनंदाची बाब आहे. तिच्या व्यक्तिमत्त्वात असणारी सौंदर्यदृष्टी म्हणजे आमच्या पिढीतील प्रत्येकाने प्रेरित होण्याची बाब आहे आणि माझ्या मते आमच्या मोहिमेत तिला मानाचे स्थान आहे कारण ती आपल्या सहचारी महिलांस प्रेरणा देऊ शकते. विकोच्या या पोषक व नवजीवनदायक उत्पादनांचा दैनंदिन जीवनात वापर करून त्यांचे आरोग्य व सौंदर्य त्या जोपासू शकतील.”

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News