सुंदर आणि ग्लोइंग स्किन मिळवण्यासाठी या फेशिअलचा वापर करा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 17 August 2019
  • चेहऱ्याकडे पाहिजे तितके लक्ष दिले जात नाही
  • फ्रुट फेशिअलच्या फायद्यांबाबत
  • व्हिटॅमिन्स मुबलक प्रमाणात चेहऱ्याला मिळतात

आपले आजकालच्या धावपळीच्या जगात  चेहऱ्याकडे पाहिजे तितके लक्ष दिले जात नाही त्यामुळे चेहऱ्याची त्वचा लवकरात लवकर चटकन उजळावी यासाठी आपण बाह्रेरच्या ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करतो आणि पार्लरमधील अनेक ब्युटी ट्रिटमेंट्सचाही आधार घेतो पण आपल्याला माहित नाही की, फळांच्या मदतीनेही म्हणजेच फ्रुट फेशिअलचा वापर करून       लवकरात लवकर झटकन ग्लोइंग आणि सुंदर अशी स्किन मिळवणं सहज शक्य होते. 
जाणून घेऊया फ्रुट फेशिअलच्या फायद्यांबाबत... 

फ्रुट फेशिअलमध्ये कोणत्याही प्रकारच्या आर्टिफिशिअल पदार्थ वापरण्यात आलेले नसतात. ज्यामुळे हे त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. फळांमध्ये असलेली पोषक तत्व म्हणजेच, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स मुबलक प्रमाणात चेहऱ्याला मिळतात. 

काकडीचा फेशिअल 
जर त्वचेवर सुरकुत्या आणि खाजेची समस्या होत असेल तर अशातच तुम्ही काकडीचं फेशिअल करू शकता. त्यामुळे स्किनचे डीप पोर्स टाइट होतात आणि ओपन पोर्सची समस्या दूर होते. काकडी फेशिअल चेहऱ्यावर यंग लूक मिळवण्यासाठी मदत करते. 

सफरचंदाचं फेशिअल
चेहऱ्याचं सौंदर्य खुलवण्यासाठी सफरचंदाचं फेशिअल अत्यंत फायदेशीर ठरतं. सफरचंदामध्ये असलेली अनेक पोषक तत्व स्किन टोन लाइट करतात आणि उजाळाही वाढवतात. सफरचंदाचा फेस पॅक सूर्याच्या घातक किरणांपासून त्वचेचं रक्षण करतो आणि एजिंग इफेक्ट्सही कमी करतो. 

केळीचं फेशिअल 
केळ्यामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शिअम असतं. ज्यामुळे हे स्किन हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करतं. ड्राय स्किनसाठी केळी रामबाण उपा ठरतात. याव्यतिरिक्त सफरचंद आणि द्राक्षांचा पॅकही ड्राय स्किनसाठी उत्तम ठरतात. 

स्ट्रॉबेरी फेशिअल 
स्ट्रॉबेरी फेशिअलही स्किन टोन लाइट करण्यासाठी मदत करतात. यामध्ये असलेलं व्हिटॅमिन सी आणि अॅन्टी-ऑक्सिडंट स्किनवरील फ्री-रॅडिकल्स आणि इतर घाण काढून टाकण्यासाठी मदत करून फ्रेश लूक देते. 

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News