विविध शेड्सच्या लिपस्टिक वापरतायं? हे वाचाच 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 12 March 2020
  • आज अनेक नामवंत ब्रॅड सौंदर्यप्रसाधने बनवतात. त्यामुळे त्यावर कंपन्यांनीच निर्बंध घालून काळजी घेतली पाहिजे असं देखील या प्रोग्राममध्ये सांगण्यात आले. 
     

लिपस्टिक वापरणं हा मेकअपचा अविभाज्य भाग आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मात्र लिपस्टिक वापरणे मोठ्या प्रमाणात घातक असल्याचं समोर आले आहे. विविध शेड्सच्या लिपस्टिकमध्ये शिसेसारख्या विषारी आणि हानिकारक धातूचा वापर केला जातो. याचे प्रमाण अधिक असल्याने त्याचा थेट परिणाम मनावर होत असल्याचं समोर आलं आहे. 

आज २२ पेक्षा अधिक नामवंत लिपस्टिक ब्रँड बाजारात आहेत.  याबाबत बोस्टनमध्ये लेड पॉयझनिंग प्रिव्हेन्शन प्रोग्रॅमच्या अंतर्गत काही तपासण्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये अनेक निष्कर्ष समोर आले. लिपस्टिकसारखे सौंदर्यप्रसाधने वापरताना काळजी घेणे गरजेचे आहे. कारण लिपस्टिक ओठांवर लावली जाते. यामुळे काही अंशतः ती पोटामध्ये जात असते. मात्र या लिपस्टिकमधील शिसेची पातळी तपासली तर ती खूपच धोकादायक असल्याचं समोर आले आहे. 

याचा परिणाम मानसिकदृष्ट्या अधिक होत आहे.  यामुळे बुद्धी आणि स्मरणशक्ती कमकुवत होत असल्याचे या तपासणीत समोर आले आहे. तरुण वयातील मुलींमध्ये मानसिक विकास होत असतो. मात्र शिसेमधील धोकादायक पदार्थांमुळे मानसिक आरोग्य खराब होते. तरुण मुली आणि प्रेग्नेंट स्त्रिया यांच्यावर हा परिणाम अधिक होतो. 

यापूर्वी देखील लिपस्टिकमढी शिसेचे प्रमाण वाढल्याने अनेक कंपन्यांना बजावण्यात आले होते. मात्र लिपस्टिकमधील शिसेचे प्रमाण अधिक असण्यावर अन्न औषध विभागाचे नियंत्रण नाहीये. संबंधित कंपन्याच यावर निर्णय घेत असतात. लिपस्टिक तयार करताना शिसेचा वापर होत नसला तरी लिपस्टिक तयार करण्यासाठी ज्या खनिजांचा वापर करण्यात येतो, त्यामध्ये शिसेच प्रमाण अधिक असते. आज अनेक नामवंत ब्रॅड सौंदर्यप्रसाधने बनवतात. त्यामुळे त्यावर कंपन्यांनीच निर्बंध घालून काळजी घेतली पाहिजे असं देखील या प्रोग्राममध्ये सांगण्यात आले. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News