उर्दू मातृभाषेचा विद्यार्थी मराठीत प्रथम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 February 2020
  • श्री शिवजी महाविद्यालयाच्या मोहसिन पठान मिळविले सलग दुसऱ्यांदा ७३ टक्के गुण 

अकोला: मुस्लिम समाज म्हटला की मातृभाषा उर्दू आणि व्यवहारिक भाषा हिंदी. त्यामुळे मराठी भाषा शिकणे आणि ती आत्मसात करून त्यात प्रावीण्य मिळविने कठीन असते. आजकाल मराठी मातृभाषा असलेले लोक सुध्दा मराठी बोलू शकत नाहीत आणि मोठ्या प्रमाणावर मराठी भाषिक विद्यार्थी नापास होताना दिसतात. मात्र, श्री शिवाजी महाविद्यालयाच्या मोहसिनने मराठीत प्रावीण्य मिळवून लौकिक प्राप्त केला आहे. 

हे यश त्याने सलग दुसऱ्यांदा तिसऱ्या सत्रामध्ये ७३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवत प्राप्त केले आहे.  मोहसिन पठान यांची मातृभाषा उर्दू असतांनाही मराठी शिकण्यासाठी मराठी विभागप्रमुख डॉ. सुलभा खर्चे, डॉ. श्रद्धा थोरात, प्रो. विनय पौकिने यांनी दिलेल्या शिकवाणीतील लहान- लहान गोष्टीवर लक्ष्य केंद्रीत करून मराठी चांगल्या पद्धतीने आत्मसात केली आहे. त्यामुळे महाविद्यालयात सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी पात्र ठरला आहे.

मोहसिनवर सर्वस्तरारतून अभिनंदनाची वर्षाव होत आहे. या यशासाठी श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य रामेश्वर भिसे, श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे कार्यकारणी सदस्य प्राचार्य राजाभाऊ देशमुख, प्रख्यात लोककवी डॉक्टर विठ्ठल वाघ यांचे हस्ते सत्कार करण्यात आला तसेच प्रा. संजय पोहरे, प्रा. विकास शिरसाट, डॉ. रावसाहेब काळे, डॉ. साधना कुलट, प्रा. शताब्दी धांडे यांचे महत्वपूर्ण मार्गदर्शन लाभले असल्याने हे यश गाठता आले असल्याचे त्याने सांगितले. मोहसिन खान पठान यांने भविष्यत स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून उच्चपदस्थ अधिकारी बनव्याचा मानस व्यक्त केला. यावेळी त्याने आई- वडील तसेच मित्रवर्गाचे विशेष आभार व्यक्त केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News