विनयभंगप्रकरणी उरणकर एकवटले

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 February 2020

प्रकरणातील आरोपी छायाचित्रकार संतोष परदेशी यास अटक केली असून न्यायालयाने २२ फेब्रुवारीपर्यंत त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे; तर सहकार्य केल्याचा आरोप असणाऱ्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका भाग्यश्री साठे यांना अटकपूर्व जमीन मिळाला आहे.

उरण : गेल्या दहा दिवसांपासून उरणमध्ये धुमसत असणाऱ्या विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणाने पेट घेतला आहे. या प्रकरणातील आरोपी छायाचित्रकार संतोष परदेशी यास अटक केली असून न्यायालयाने २२ फेब्रुवारीपर्यंत त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे; तर सहकार्य केल्याचा आरोप असणाऱ्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका भाग्यश्री साठे यांना अटकपूर्व जमीन मिळाला आहे. त्यामुळे संतप्त उरणकर एकवटले असून मुख्याध्यापिकेवर कारवाई करण्यात यावी, याबाबतचे निवेदन वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांना देण्यात आले आहे. याबाबतची माहिती शुक्रवारी (ता.२१) आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पालकांनी दिली. 

उरणमधील आठवीत शिकणारी मुलगी शिक्षणाकरिता मामाच्या घरी उरण बोरी येथे राहत होती. ११ फेब्रुवारीला दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास ती शाळेतून घरी जात असताना संतोष परदेशीने मुलीचा पाठलाग करत विनयभंग केला. याची माहिती मुलीने शाळेत दिली होती. मात्र, त्‍यांनी आरोपीची बाजू सांभाळत उलट मुलीचीच चूक असल्याचे सांगत तिला दमदाटी केली. याशिवाय तिला दुसऱ्या कोणत्याही शाळेत प्रवेश मिळणार नाही, असे खडसावले होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News