अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची 'अशी' होणार फेरपरीक्षा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 23 July 2020

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पास करण्याची मागणी पालकांनी सरकारला केली होती. मात्र सरकारने ही मागणी फेटाळली. पारंपारिक नियमाप्रमाणे विद्यार्थ्यांचा निकाल शाळा, महाविद्यालयांनी जाहीर करावा असा आदेश देण्यात आला.

मुंबई : अनेक दिवसांपासून प्रलंबीत असलेला नववी, अकरावी अनुउत्तीर्ण विद्यार्थ्यांचा प्रश्न अखेर मार्गी लागला. 'शाळा, महाविद्यालयांनी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घेऊन निकाल लावावा आणि उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश द्यावा' असा आदेश राज्य सरकारने शिक्षण विभागाला दिला. त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वर्षात जाण्याचा मार्ग मोकळा झाला. 'अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांबाबद सरकराने निर्णय जाहीर करावा' या मागणीसाठी विद्यार्थी आणि पालकांनी दर मंगळवारी ऑनलाईन आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेऊन सरकारने अखेर निर्णय जाहीर केला.

दरवर्षी जुन महिन्यात शाळा, कनिष्ठ महाविद्यालय सुरु झाल्यानंतर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा आयोजिक केली जाते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अनुउत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार सरकारने केला नाही. त्यामुळे अनुउत्तीर्ण विद्यार्थ्यांचे काय करावे? असा प्रश्न मुख्याध्यापक आणि पालकांपुढे निर्माण झाला. अनुउत्तीर्ण विद्यार्थ्यांना पास करण्याची मागणी पालकांनी सरकारला केली होती. मात्र सरकारने ही मागणी फेटाळली. पारंपारिक नियमाप्रमाणे विद्यार्थ्यांचा निकाल शाळा, महाविद्यालयांनी जाहीर करावा असा आदेश देण्यात आला. त्यामुळे उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील सरासरी १० टक्के विद्यार्थी नापास झाले. नापास विद्यार्थ्यांचा निर्णय शिक्षण विभागाने तात्काळ घ्यावा अशी मागणी शिक्षण परीषदेणे सरकारकडे केली होती, पालकांचे आंदोलन आणि शिक्षण परीषदेच्या मागणीचा विचार करुन सरकारने तोंडी परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा मार्ग मोकळा झाला.  

 

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची कशी होणार परीक्षा?

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना शक्य झाल्यास टप्प्या- टप्याने शाळेत बोलावून किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तोंडी परीक्षा घ्यावी. ७ ऑगस्टपर्यंत तोंडी परीक्षेता कार्यक्रम पुर्ण करावा. त्यानंतर निकाल लावून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश द्यावा. तोंडी परीक्षा काळात विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न उद्धभवणार नाही याची खबरदारी विद्यार्थी, पालक, शिक्षण, शाळा प्रशासनाने घ्यावी असे आदेशात म्हटले आहे.   

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News