नेतृत्व विकसीत करण्याचे काम विद्यापीठाचे : डॉ. सुहास पेडणेकर

स्वप्नील भालेराव (सकाळ वृत्तसेवा- यिनबझ)
Thursday, 14 May 2020

फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरुंची 'यिनबझ'साठी खास मुलाखत घेण्यात येत आहे. गुरुवारी (ता.14) मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. यावेळी कुलगुरूंनी 'विद्यार्थ्यांना लॉकडाउनच्या काळात हे कराचं' या विषयांवर तरुणाईशी संवाद साधला

'देशाला नेतृत्व गुणाची आवश्यकता आहे. तरुणाईत नेतृत्व विकसीत करण्याचे काम विद्यापीठाचे आहे. विद्यापीठ हे काम करत आहे. मात्र, नेतृत्व स्वीकारण्याचे काम विद्यार्थ्यांचे आहे. नेत्रृत्व विकसीत करण्यासाठी मानवी मुल्य आणि कौशल्य हे दोन गुण आवश्यक आहेत' असे मत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर यांनी व्यक्त केले.

फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरुंची 'यिनबझ'साठी खास मुलाखत घेण्यात येत आहे. गुरुवारी (ता.14) मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. यावेळी कुलगुरूंनी 'विद्यार्थ्यांना लॉकडाउनच्या काळात हे कराचं' या विषयांवर तरुणाईशी संवाद साधला.

आधुनिक जीवनशैलीमुळे मानवी मुल्य काही प्रमाणात कमी झाले होते. मात्र, कोरोनामुळे मानवी मुल्यांचे महत्व पुन्हा कळाले. जात, धर्म, वंश, लिंग कोणताही भेदभाव न करता मानवाने निस्वार्थपणे एकमेकांची मदत केली हे मानवी मुल्यांचे आदर्श उदाहरण आहे. अहिंसा, दया,  क्षमा, ज्ञान, शांती, विश्वास, सत्य, प्रेम या आठ गोष्टींचा समावेश मानवी मुल्यात होतो. प्रत्येकांकडे काही कौशल्य असतात. आपल्याकडे कोणती कौशल्य आहेत याचा शोध घेऊन ती विकसीत करावी, आपली कौशल्य विकसीत करण्याचा लॉकडाऊन हा योग्य वेळ आहे. कौशल्य विकसीत केल्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात फायदा होईल असा विश्वास पेडणेकर यांनी व्यक्त केला.

भविष्यातील शिक्षण पद्धती तीन घटकावर आधारीत

तंत्रज्ञान, नाविन्य आणि शिक्षणाचे स्वांतत्र्य या तीन घटकावर भविष्यातील शिक्षण पद्धती अवलंबुन आहे. भविष्यातील शिक्षण पद्धतीत तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तंत्रस्नेही झाले पाहीजे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहीजे. अभ्यासक्रमाच्या पलिकडे जाऊन विद्यार्थ्यांनी विचार करावा. नावीन्यपुर्ण गोष्टी निर्माण कराव्या. अभिनव उपक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात स्कोप असेल. त्यामुळे नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करावा. विद्यार्थ्यांना कोणत्याही विद्यापीठात, कोणत्याही विषयात शिक्षण घेण्याचे स्वंतत्र्य देण्यात येईल. सर्व विषयाचे गुण एकत्र करुन त्यांना पदवी दिली जाईल. अशा प्रकारे शिक्षण पद्धती असेल.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News