विद्यापीठ शिकण्यासाठी आहे वाद, मोर्चे करण्यासाठी नाही

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 11 January 2020

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) येथे घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेच्या निषेधार्थ काही विद्यार्थी संघटनांनी ‘महाविद्यालय बंद’ची हाक दिली. दरम्यान अनेक विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या त्याचसंदर्भात धुळे येथील सरस्वती डी.एम.ल.टी महाविद्यालयच्या एका विद्यार्थ्याने JNU हल्ल्यासंदर्भात अशी प्रतिक्रिया दिली.

विद्यार्थ्यांमधील सध्याच्या अस्वस्थेमागची कारणे फक्त राजकीय नाहीत, अनेक कारणांधून हे एक कारण असू शकते. जर नेतृत्व करण्याची पूर्ण क्षमता असेल तरच तरुणांनी राजकारणात यावे, फक्त फोटो आणि प्रसिद्धीसाठी राजकारणात आयुष्य वाया घालू नयेत. शिक्षीत लोकांनी नक्की राजकारणात यावं. विविध राजकीय पक्ष आणि संघटना विद्यार्थ्यांनाचा गैरवापर करुन वेठीस धरतात. पूर्वी विद्यार्थी संघटना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांविषयी जागरूक होत्या आता मात्र, अजिबात नाहीत. विशिष्ट राजकीय भूमिका घेऊन व्यक्त होण्याकडे माझा कल नाही. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणूनच लोकांनासाठी लढण्याची इच्छा आहे. विद्यार्थ्यांवरचा हल्ला लोकशाहीवरचा हल्ला आहे. विद्यार्थ्यांनी देखील राष्ट्रप्रेम जपले पाहिजे. विद्यापीठ शिकण्यासाठी आहे वाद, मोर्चे करण्यासाठी नाही. जर विद्यार्थी राजकीय लोकांचा सहभाग न घेता हक्कासाठी लढत असतील तर नक्कीचं पोलिसांनी देखील सहकार्य करणे गरजेचे आहे हल्ली मात्र अस दिसून येत नाही.
- प्रकाश शरद पाटील,
सरस्वती डी.एम.ल.टी महाविद्यालय, धुळे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News