ठरलं ! या तारखेपासून सुरु होणार विद्यापीठाची परीक्षा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 15 July 2020

यंदा प्रथम ऑनलाईन ओपन बुक परीक्षा १७ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाने न्यायालयात दिली होती.

नवी दिल्ली: अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या दिल्ली विद्यापीठाच्या परीक्षा १० ऑगस्ट पासून सुरु होणार आहे. तर ३१ ऑगस्ट पर्यंत चालतील अशी माहिती विद्यापीठाने उच्च न्यायालयात दिली. पदवी पुर्व अभ्यासक्रमाला शिकणाऱ्या अंतिम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा ओपन बुक एक्झानद्वारे (OBE) ऑनलाईन घेतल्या जाणार आहेत. काही आडचणींमुळे परीक्षा न देऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे परीक्षांपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही असे नियोजन करण्यात आले आहे, असे न्यायालयात सांगण्यात आले. 

दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन विद्यार्थ्यांच्या परीक्षा स्थगीत करण्यात आल्या. कोरोनामुळे ऑफलाईन परीक्षा घेणे शक्य नाही, त्यामुळे यंदा प्रथम ऑनलाईन ओपन बुक परीक्षा १७ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती दियू विद्यापीठाने न्यायालयात दिली होती.

'परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा असतो. तर काही विद्यार्थ्यांना नोकरीसाठी अर्ज करायचा असतो त्यामुळे परीक्षांना उशीर झाल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करुन विद्यापीठांने परीक्षांचा कालावधी कमी करण्याचा फेर विचार करावा' असा आदेश न्यायालयाने विद्यापीठाला दिला. त्यानंतर परीक्षांचा कालवधी कमी करुन १० ऑगस्ट ते  ३१ ऑगस्ट करण्यात आल्याची माहिती न्यायालयास दिली. ऑनलाईन ओबीई परीक्षेत कोणतीही अडचन निर्माण होऊ नये यासाठी विद्यापीठाने जय्यत तयारी केली. विद्यार्थ्यांना ओबीई ऑनलाईन परीक्षेची सविस्तर माहिती देण्यासाठी २७ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान विद्यार्थ्यांची सराव परीक्षा (मॉक टेस्ट) घेण्याचे नियोजित करण्यात आले होते. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News