विद्यापीठ परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 12 May 2020

विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्यावतीने परीक्षांचे नियोजन व शैक्षणिक वेळापत्रकाबाबत परिपत्रक क्रमांक 102/2020 प्रकाशित केले

अमरावती : कोव्हीड-19 च्या प्रादुर्भावामुळे व त्यानुसार झालेल्या टाळेबंदीमुळे राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठाच्या परीक्षा व शैक्षणिक वेळापत्रकांचे नियोजन करण्याकरीता राज्य शासनाने समिती गठीत केली होती. सदर समितीने केलेल्या शिफारसी शासनाने स्विकृत केल्या असून त्यानुषंगाने विद्यापीठांनी आवश्यक कार्यवाही करुन अधिनस्त महाविद्यालयांना कळविण्याबाबत सूचित केले होते. या शिफारसी महाविद्यालये, शिक्षक व विद्यार्थ्यांना माहिती व्हाव्यात व त्यांच्या मनात कोणताही संभ्रम राहू नये तसेच त्यांना या बाबींची प्राथमिक माहिती अवगत व्हावी, या हेतूने विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्यावतीने परीक्षांचे नियोजन व शैक्षणिक वेळापत्रकाबाबत परिपत्रक क्रमांक 102/2020 प्रकाशित केले आहे. प्राप्त शिफारसी विद्यापीठाच्या सक्षम प्राधिकारणांसमोर सादर करण्यात येणार आहे.

अंतिम वर्षामध्ये प्रवेशित असलेल्या विद्याथ्र्यांना द्यावयाची अंतिम सत्राची परीक्षा, बॅकलॉगचे विषय, महाविद्यालयांनी घ्यावयाची परीक्षा, महाविद्यालयांनी करावयाची कार्यवाही, उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन, प्रात्याक्षिक / प्रकल्प परीक्षा, निकाल जाहीर करणे, श्रेणी सुधारण्यासाठी पुन्हा परीक्षा, परीक्षा आवेदनपत्रे, परीक्षांचे व नवीन शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक, उन्हाळी सुट्ट्या आदींबाबत सविस्तर माहिती परीक्षा विभागाकडून प्रसारित करण्यात आलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आली आहे.  सदर परिपत्रक क्रमांक 102/2020 विद्यापीठाच्या www.sgbau.ac.in या संकेतस्थळावर दिलेले आहे.  तरी याबाबत सर्व संबंधित विद्यार्थी, पालक, शिक्षक व सर्व संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य यांनी नोंद घ्यावी, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख यांनी विद्यापीठाच्यावतीने कळविले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News