'या' विद्यापीठात पदवी परीक्षा फक्त ३० गुणांची होणार 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 24 July 2020

केला. पुढील महिन्यात ५ ऑगस्टपासून परीक्षांना सुरुवात होणार आहे. मात्र ही परीक्षा केवळ ३० मार्कांची होणार आहे. कारण युजीसीचे मार्गदर्शक तत्व जाहीर होण्यापुर्वीच एएमयुने ७० गुणांचे मुल्यामापन वेगळ्या पद्धतीने केले आहे.

अनेक दिवसांपासून पदवी परीक्षा घेण्यावरुन देशात वादंग सुरु आहे. या वादंगाला सध्या वेगवेगळे वळन मिळत आहे. काही राज्यांनी परीक्षा घेण्यास विरोध केला तर बहुतांश विद्यापीठांनी परीक्षा आयोजिक करण्यास सुरुवात केली. अशावेळी अलीगड मुस्लिम विद्यापीठाने (AMU) वेगळा निर्णय जाहीर केला. या निर्णयावर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. 

युजीसीच्या मार्गदर्शक तत्वानुसार, अलीगड मुस्लिम विद्यापीठाने पदवीपुर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला. पुढील महिन्यात ५ ऑगस्टपासून परीक्षांना सुरुवात होणार आहे. मात्र ही परीक्षा केवळ ३० मार्कांची होणार आहे. कारण युजीसीचे मार्गदर्शक तत्व जाहीर होण्यापुर्वीच एएमयुने ७० गुणांचे मुल्यामापन वेगळ्या पद्धतीने केले आहे. शुक्रवारी (ता. २४) विद्यापीठ क्षेत्रातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाचे विभागप्रमुख, परीक्षा नियंत्रक यांची कुलगुरुंनी बैठक आयोजित केली. यावेळी वायवा पद्धतीने ३० मार्कांची परीक्षा घेण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला. अलीगड मुस्लिम विद्यापीठाने सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रीया सुरु केली आहे. त्याच बरोबर विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग सुरु केले आहेत.  

विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील ७५५ विद्यापीठांना परीक्षा आयोजित करण्यासाठी पत्र पाठवले होते. त्यावर ६०३ विद्यापीठानी प्रतिक्रीया व्यक्त केली. त्यातील २०९ विद्यापीठांनी यापुर्वीच युजी आणि पीजी अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेतल्या आहेत. ३९४ विद्यापीठ ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात परीक्षा आयोजित करणार आहेत, अशी माहिती युजीसीने गुरुवारी जाहीर केली. मात्र, महाराष्ट्र, दिल्ली, तामिळणाडू, पंश्चिम बंगाल आदी राज्यांनी परीक्षा घेण्यास विरोध केला. तर देशातील ३१ विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थी संघटनांनी युजीसीच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांची सोमवारी  सुनावणी होणार आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News