परीक्षांबाबत मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे स्पष्टीकरण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 13 July 2020

प्रिन्स्टन, एमआयटी, केंब्रिज, इम्पिरियल कॉलेज ऑफ लंडन, टोरंटो, हॉंगकॉंग आदी विद्यापीठांनी परीक्षांसाठी ऑनलाईन तंत्रज्ञान विकसित केले आहे.

परीक्षांबाबत मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली -  सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहून महाराष्ट्रासह सहा राज्यांनी अंतिम परीक्षा घेण्यास विद्यापीठ अनुदान आयोगाला विरोध दर्शवला होता, परंतु विद्यापीठ अनुदान आयोगाच्या जाहीर केलेल्या सुचनाचे पालन करणे बंधनकारक असल्याचे सुध्दा मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नुकतेच स्पष्ट केले आहे. 

महाराष्ट्र, पंजाब, ओडिशा, तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि दिल्ली या राज्यांतून अंतिम परीक्षा घेण्यात विरोध दर्शविला होता. कारण तिथे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला आहे. तसेच परीक्षा घेण्याची परिस्थिती नसल्याचे सर्व राज्यांचे म्हणणे आहे. 

(युजीसी)ने मागच्या आठवड्यात राज्यांना सुधारित सुचना जाहीर केल्या होत्या. त्यामध्ये विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा जुलैऐवजी सप्टेंबरमध्ये घ्याव्यात असं स्पष्ट केलं आहे. (युजीसी)ने कोरोनाची परिस्थिती पाहून एप्रिलमधील परीक्षा जुलै महिन्यात घ्याव्यात जाहीर करण्यात आलं होतं. 

आयोजित केलेल्या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचं आत्मसमर्पण वाढतं, त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास हा विद्यार्थ्यांना समाधान देत असतो. या तीन गोष्टी त्यांच्या गुणवत्तेला जागतिक मान्यतेसाठी गरजेच्या असतात असे मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट करण्यात आले आहे. 

विशेष म्हणजे प्रिन्स्टन, एमआयटी, केंब्रिज, इम्पिरियल कॉलेज ऑफ लंडन, टोरंटो, हॉंगकॉंग आदी विद्यापीठांनी परीक्षांसाठी ऑनलाईन तंत्रज्ञान विकसित केले आहे. परीक्षा पेच सोडवण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अधिका-यांची या आठवड्यात राज्यांच्या शिक्षण सचिवांची बैठक आयोजित करण्याची शक्यता आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News