प्रयोगशील शिक्षणासाठी करोळमधील शाळेचा आगळा-वेगळा कार्यक्रम

भगवान खैरनार
Friday, 6 March 2020

मोखाडा : विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण मिळावे, म्हणून सरकार विविध उपक्रम राबवत आहे. त्यापुढे जाऊन मोखाड्यातील करोळ येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी प्रयोगशील शिक्षणाला कौशल्य विकासाची जोड देत बालआनंद मेळावा आणि संबोध जत्रा भरवून अभिनव उपक्रम राबवला. या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना मनमुराद आनंद लुटला; तर उपस्थितांनी यास टाळ्यांची दाद दिली.

विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी, शाळेतील उपस्थिती वाढावी, मुलं शाळाबाह्य होऊ नयेत, म्हणून सरकार विविध उपक्रम राबवत आहे. त्यासाठी शिक्षकांना वेळोवेळी प्रशिक्षणही दिले जात आहे; मात्र, यापुढे एक पाऊल टाकत मोखाड्यातील करोळ येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी आगळा-वेगळा कार्यक्रम घेतला.

कार्यक्रमाचे उद्‌घाटन जिल्हा परिषद सदस्या कुसुम झोले यांच्या हस्ते झाले. पंचायत समिती सदस्य व माजी सभापती प्रदीप वाघ अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी रामचंद्र विशे, पंचायत समिती सदस्या आशा झुगरे, उपेंद्र सोनटक्के, भाजप युवा कार्यकर्ते मिलिंद झोले उपस्थित होते. 

करोळ जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिले ते आठवीचे वर्ग असून १५१ विद्यार्थी आहेत. येथील विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा, आनंददायी वातावरण निर्माण व्हावे, कृतियुक्त व्यवहार ज्ञान मिळावे, गणिताचे ज्ञान मिळावे, व्यवसाय शिक्षणाची माहिती व्हावी, व्यवसायाविषयी आत्मविश्‍वास निर्माण व्हावा, कोणतेही काम चांगलेच असते, याची त्यांनी जाणी व्हावी. तसेच मनोरंजनातून शिस्त आणि स्वच्छतेचा संदेश मिळावा म्हणून ‘बाल आनंद मेळावा’ व ‘संबोध जत्रा’ भरवण्यात आली. 

कार्यक्रमाची संकल्पना आणि कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक विलास साबळे, सखाराम रेरे, कांचन सोनटक्के, अर्चना वैद्य, नंदकुमार वाघ, विष्णू सोगीर, प्रभाकर वाघमारे आणि अभय तळेकर यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News