धक्कादायक! 'या' देशात अनोखा नियम; लॉकडाऊनचे नियम मोडलात तर थेट गोळी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 17 July 2020

एका देशात लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या नागरिकांना थेट मृत्यृची शिक्षा दिली जात आहे. हे ऐकुण अनेकांना धक्का बसेल मात्र हे खर आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संपुर्ण देशाने लॉकडाऊनचा मार्ग अलंबला. प्रत्येक देशाने आपल्या गरजेनुसार लॉकडाऊनचे नियम बनवले. लॉकडाऊन काळात नियम मोडणाऱ्या नागरिकांवार काही देशात कडक कार्यवाही केली जात आहे. तर काही देशात नाममात्र कार्यवाही होत आहे. एका देशात लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या नागरिकांना थेट मृत्यृची शिक्षा दिली जात आहे. हे ऐकुण अनेकांना धक्का बसेल मात्र हे खर आहे.

एक वृत्तसंस्थेनी दिलेल्या माहितीनुसार कोलंबिया देशात काही स्वंयशोषीत टोळ्यानी लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या नागरिकांनी हत्त्या केली आहे. आतापर्यंत आठ जणांचा त्यात नाहक बळी गेला. कोलंबियात अंमली पदार्थ विकणाऱ्या टोळ्यांनी दहशत माजवली आहे. ग्रामीण भागात या टोळ्यांचे वर्चस्व अधिक आहे. त्यामुळे ग्रामीण नागरिकांना लॉकडाऊन नियम पाळण्याचा आदेश टोळ्यांकडून दिला जात आहे. कुमको शहरात मासेमरीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो, लॉकडाऊन काळात मच्छिमारांना व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली. सायंकाळी पाच नंतर सर्व व्यवसाय बंद करावे, विनाकरण रस्त्यांवर कोणाही फिरु नये, या नियमाचे पालन न केल्यास थेट हत्या करण्यात येईल असा जाहीर आदेश टोळ्यांनी काढला आहे. 

शहापासून ते ग्रामीण भागापर्यंत टोळ्याची साखळी आहे. व्हॅट्सअॅपद्वारे नागरिकामध्ये दहशत पसरवण्याचे काम टोळ्यांकडून केले जात आहे. या टोळ्यात तरुणांपासून पन्नास वर्षापर्यंचे व्यक्ती आहे. सध्या सरकार आणि टोळ्याचा संघर्ष कोलंबिया सुरु आहे मात्र, सरकारला टोळ्यांवर नियंत्रन मिळवण्यात अद्याप यश आले नाही. सध्या कोलंबियात १ लाख ६० हजार नागरिकांना करोनाचा संसर्ग झाला. त्यातील ५ हजार ६२५ नागरिक कोरोनामुळे दगावले. सरासरी दरदिवसी ५ हजार नागरिकांना करोनाची लागण होत आहे. अशावेळा कोरोनापेक्षा टोळ्यांची भीती नारिकांमध्ये निर्माण झाली आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News