मेरठच्या तरुणाची अनोखी कामगिरी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 3 December 2019

राज्यातल्या खेळाडू मुलाला थेट राष्ट्रीय टीमचा कर्णधार करण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्रियमची घरची परिस्थितीही बेताची आहे. वडील नरेश गर्ग टॅक्सी चालवायचे. पण त्यांनी मुलाला स्वप्न पाहण्यापासून आणि ते सत्यात उतरण्यापासून रोखले नाही.

लहानपणापासून आई -वडिलांचे कष्ट  पाहणारी मुले आजच्या जगात खूप आहेत.आपल्या मुलांनी मोठे होऊन काहीतरी चांगले आणि यशस्वी बनावे या एजकच उद्देशाने प्रत्येक आई बाप मुलांना मोठे करत असते. त्याच प्रमाणे मुले सुद्धा आई वडिलांचे कष्ट बघून मोठे व्हायची स्वप्न बघत यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि त्याची जिद्द हीच त्यांच्या आयुष्याचे ध्येय बनते आणि एक दिवस आई वडिलांना अभिमानाने जगात वावरायला मिळते . अशीच एक अभिमानाची कामगिरी मेरठ च्या एका तरुण मुलाने केली आहे. त्याचे नाव आहे प्रियमगर्ग असून अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात  संपूर्ण टीम चा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. 

दक्षिण आफ्रिकेत पुढील वर्षी होणाऱ्या अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची सोमवारी घोषणा झाली.राज्यातल्या खेळाडू मुलाला थेट राष्ट्रीय टीमचा कर्णधार करण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्रियमची घरची परिस्थितीही बेताची आहे. वडील नरेश गर्ग टॅक्सी चालवायचे. पण त्यांनी मुलाला स्वप्न पाहण्यापासून आणि ते सत्यात उतरण्यापासून रोखले नाही.

प्रियम उजव्या हाताने खेळणारा फलंदाज आहे. तो यूपीच्या रणजी संघात होता. त्याने वयाच्या आठव्या वर्षीपासून खेळायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याचे आई-वडिल त्याचा खेळाकडे असणारा ओढा पाहून काहिसे चिंतेत होते. त्याने अभ्यासाकडे लक्ष द्यावं असं त्यांना वाटे. प्रियमने स्वत:च्या मेहनतीने हे स्थान पटकावलं आहे. या आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी संघाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी त्याने आपल्या आईला समर्पित केली आहे. 'माझ्या आईचं हे स्वप्न होतं. तिला मला क्रिकेटमध्ये मोठे सामने खेळताना पहायचं होतं,' असं प्रियमने सांगितलं. प्रियमच्या आईचं आठ वर्षांपूर्वी निधन झालं.

प्रियमचे  वडिल नरेश गर्ग यांनी सांगितले, 'माझ्याकडे फार साधनं नव्हती. प्रियमचा खेळ पाहून मी त्याला शक्य त्या सर्व सुविधा देण्याचा निर्णय घेतला. आधी मी टॅक्सी चालवायचो, पण काही वर्षांपूर्वी प्रियमची रणजीत निवड झाल्यानंतर परिस्थिती खूप सुधारली.'

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News