आयआयटी पवईचा अनोखा पदवीदान समारंभ; विद्यार्थ्यांनी स्वीकारले व्हर्चुलर पदवी प्रमाणपत्र 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 August 2020

नाविन्यपुर्ण प्रयोगासाठी आयआयटी पवई देशभारात ओळखली जाते, दरवेळी पदवी समारंभात नवीन कल्पनेची भर पडते. यावेळी तर आश्चर्यचकित करणारा पदवीदान समारंभ होता, विद्यार्थ्यांचे नाव पुकारल्यानंतर विद्यार्थ्यांसारखा दिसणारा आभाळाशी पुतळा पाहुण्यांसमोर जाऊन उभा टाकयचा, पाहुण्यांनी त्यांच्या गळ्यात हार टाकून पदवीदान करायचे, त्यामुळे सर्वांनाच एक आश्चर्याचा धक्का बसला.

मुंबई : देशातील महत्त्वाची शिक्षण संस्था म्हणून आयटी पवईकडे इकडे पाहिले जाते. दरवर्षी धूमधडाक्यात पदवीदान समारंभ पार पडतो मात्र, यंदा कोरोनाच्या संसर्गामुळे प्रत्यक्ष पदवीदान समारंभ रद्द करण्यात आला आणि ५८ वा व्हर्चुलर पदवीदान समारंभ रविवारी (ता.23) संपन्न झाला. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन संपन्न झालेल्या समारंभाची चर्चा सर्वत्र रंगली होती. 

नाविन्यपुर्ण प्रयोगासाठी आयआयटी पवई देशभारात ओळखली जाते, दरवेळी पदवी समारंभात नवीन कल्पनेची भर पडते. यावेळी तर आश्चर्यचकित करणारा पदवीदान समारंभ होता, विद्यार्थ्यांचे नाव पुकारल्यानंतर विद्यार्थ्यांसारखा दिसणारा आभाळाशी पुतळा पाहुण्यांसमोर जाऊन उभा टाकयचा, पाहुण्यांनी त्यांच्या गळ्यात हार टाकून पदवीदान करायचे, त्यामुळे सर्वांनाच एक आश्चर्याचा धक्का बसला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक विजेते प्राध्यापक डंकन हॅल्डेन आणि ब्लॅकस्टोनचे सीईओ स्टीफन श्वाटर्समन उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष पद आयआयटीचे संचालक डॉक्टर सुभाशीक चौधरी यांनी भुषविले. 2 हजार 404 विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर, व्यवस्थापनाच्या पदव्या देण्यात आल्या. 151 विद्यार्थ्यांना पीएचडी देण्यात आली.  साहिल शहा या विद्यार्थ्यांचे राष्ट्रपती पदक पटकावली.

विशिष्ट ध्येयाने संशोधन करताना अनपेक्षितपणे एखाद्या गोष्टीविषयी उत्सुकता निर्माण होते. ती उत्सुकता दाबुन न टाकता, वेळ देऊन त्याचे निरीक्षण करावे, त्यामधून अनपेक्षितपणे मोठे संशोधन निर्माण होतात असा मोलाचा सल्ला नोबेल विजेते प्राध्यापक डंकन हॅल्डेन यांनी विद्यार्थ्यांना दिला. भविष्यात काही विद्यार्थी शास्त्रज्ञ होतील तर काही तंत्रज्ञ होतील, नव निर्मिती करण्यासाठी तंत्राचा उपयोग होतो. आपल्या संशोधनाचा फायदा फक्त देशाताला न होता संपूर्ण जगाला हवा असे संशोधन निर्माण करावे असे आवाहन डंकन हॅल्डेन यांनी केले. 

सध्या संपूर्ण देशातील दहा बड्या कंपन्यांपैकी चार कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी भारतीय वंशाचे आहेत. त्यामुळे नवीन विद्यार्थ्यांना मोठा जगामध्ये स्कोप आहे. त्यासाठी मोठे स्वप्न पहा, प्रत्येक संकटात संधी शोधा, नाविन्यपूर्ण प्रयोग करा, जबाबदारी आनंदाने सांभाळा, त्यामुळे विद्यार्थ्यांन नव नवीन शिकता येते असे मत मार्गदर्शक स्टीफन श्वाटर्समन यांनी व्यक्त केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News