अधुर प्रेम

अशोक पवार
Thursday, 22 August 2019

पण तुझं ह्रदय नक्कीच झालय

दुसर कुणाचं ....

न बोलून तू काय?

मिळवणार आहेस ते सांग

तू विसरली ग सगळं
मी कस विसरू...

ते ही तूच सांग...

तुझ्याच मधाळ शब्दांनी 

घायाळ केलं होतं

त्या हळुवार शब्दांनी

मन हे तुझं झालं होतं....

हळुवार असणार नात

फुलत असताना 

काहीच कसं वाटत नाही तुला

ते तोडून जाताना...

फुलण्या आधीच एखादी 

कळी तोडून घ्यावी 

तस फुलण्या आधीच

हे प्रीत फुल तोडलंस तू....

का? सांग अस अल्प काळ

मला तुझ्या सोबत जोडलस तू...
 

बेफाम सागर
लाटांनी उसळी घ्यावी 
 
ध्वस्त करावे किनारे ..

तस झालंय मनाचं ....

एक विचारतोय मैत्रीच्या नात्याने

उत्तर दे अथवा देऊ नकोस 

पण तुझं ह्रदय नक्कीच झालय

दुसर कुणाचं ....

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News