भारतात बेरोजगारीचे आकडे आले समोर, वाचा सविस्तर

यिनबझ टीम
Tuesday, 3 March 2020

भारतातील बेरोजगारीची नवी आकडेवारी समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्यात देशात बेरोजगारीचा दर 7.78 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. ऑक्टोबर, 2019 नंतर ही आकडेवारी गेल्या चार महिन्यांतील सर्वाधिक आहे.

भारतातील बेरोजगारीची नवी आकडेवारी समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्यात देशात बेरोजगारीचा दर 7.78 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. ऑक्टोबर, 2019 नंतर ही आकडेवारी गेल्या चार महिन्यांतील सर्वाधिक आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी म्हणजेच CMIE ने 2 मार्च रोजी ही माहिती दिली.

या अहवालानुसार जानेवारीत बेरोजगारीचा दर 7.16 टक्के इतका होता. हीच आकडेवारी देशाच्या आर्थिक मंदीची तीव्रता दर्शवते, हे नक्की. ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर वाढला आहे. फेब्रुवारीमध्ये खेड्यांमधील बेरोजगारी 7.37 टक्क्यांवर गेली आहे जी जानेवारी महिण्यात हे प्रमाण 9.9 टक्के होते. सप्टेंबर ते डिसेंबर, 2019 या चार महिन्यांत बेरोजगारीचे प्रमाण सरासरी 7.5 टक्के होते. ऑगस्ट आणि ऑक्टोबर 2019 मध्ये बेरोजगारीचे प्रमाण 8 टक्क्यांच्या पुढे गेले होते. 28 फेब्रुवारी रोजी नवीन जीडीपी आकडेवारी समोर आली. यामध्ये 2019-20 च्या तिसर्‍या तिमाहीतील जीडीपी 4.7 टक्के होता. मागील तिमाहीत जीडीपी 4.5 टक्के होता. 

2019 च्या शेवटच्या तीन महिन्यांत भारताचा विकास दर गेल्या सहा वर्षांत सर्वात कमी राहिला आहे. विश्लेषकांचे म्हणणे आहे की कोरोना विषाणूमुळे भारतीय अर्थव्यवस्थेत आणखी सुस्तपणा दिसून येतोय.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News