समजा; सगळ्या जगात कोरोना व्हायरस पसरला तर?

यिनबझ टीम
Sunday, 23 February 2020

तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत कोरोनाचे हजारो बळी तयार झाले. आतापर्यंत केवळ चीनमध्ये सुमारे 2200 लोक मरण पावले आहेत. सर्वात चिंताजनक म्हणजे कोरोनाचे निदान करण्यासाठी अजून कोणतीच लस चिनमध्ये उपलब्ध नाही.

कोरोना विषाणू हा 2003 च्या सार्सपेक्षाही भयानक आजार ठरला आहे. स्वाइन फ्लूचा प्रसार जगभर पसरत नव्हता. 2014 मध्ये इबोला सारख्या आजारानेदेखील इतकं थैमान घातलं नव्हतं. परंतु हा विषाणु अत्यंत धोकादायक आहे, कारण हा विषाणू वायुमार्गाने पसरतो. व्हायरस किती धोकादायक आणि गंभीर आहे, याबद्दल तज्ञांची भिन्न मते आहेत. काही तज्ज्ञांचे मत आहे की चीनमधील बाधित भागात शाळा, कार्यालये आणि मॉल्स सुरू झाल्याने हा रोग पुन्हा वाढू लागला.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, मिशिगन विद्यापीठाचे प्रोफेसर हॉवर्ड मर्केल म्हणतात, “प्रत्येक विषाणू वेगळा असतो. 'जुन्या साथीच्या रोगांचा आधार घेऊन जर कोणी वर्तमानातल्या कोरोनावर भाष्य करत असेल, तर तो एक मूर्ख  असू शकतो किंवा खोटं बोलू शकतो. तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत कोरोनाचे हजारो बळी तयार झाले. आतापर्यंत केवळ चीनमध्ये सुमारे 2200 लोक मरण पावले आहेत. सर्वात चिंताजनक म्हणजे कोरोनाचे निदान करण्यासाठी अजून कोणतीच लस चिनमध्ये उपलब्ध नाही.

1892 साली युरोपमध्ये हैजा नावाच्या आजाराची बातमी लपवली होती, त्यामुळे त्याच्यावर निधान करताना नाही आले आणि तो जगभर पसरू लागला होता. जर्मनीच्या हॅम्बुर्गमध्ये कॉलरामुळे 8 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. यानंतर या आजाराने न्यूयॉर्कमध्येही प्रवेश केला होता.

दुसरीकडे, चायनीज सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या अभ्यासानुसार असे म्हटले आहे की कोरोनाच्या  नवीन पेशंटच्या दरात कमी झाली असली तरी जशी जशी अर्थव्यवस्था पुन्हा सुरू होईल, तसा आजार परत पसरण्यास सुरू होईल. या महिन्यात प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे की, "लोक पुन्हा मोठ्या संख्येने शाळा आणि कार्यालयात परत येतील." कोविड 1-9 च्या संभाव्य प्रसाराबद्दल आम्हाला येत्या आठवड्यात पुन्हा एकदा सज्ज असावे. 

लक्षणे नसलेल्या लोकांमध्ये विषाणूचा प्रसार होऊ शकतो की नाही हे अद्याप संशोधकांना माहिती नाही. लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रोपिकल मेडिसिनचे स्टीव्ह रिले म्हणाले, “विषाणूची मुळे एकत्र झाली आहेत. याचा परिणाम एसएआरएसपेक्षा जास्त लोकांवर झाला आहे. जर तो जगाच्या इतर भागात पसरला तर हा एक गंभीर विषाणू निर्माण होईल आणि संपूर्ण जगात एक वेगळच वातावरण निर्माण होईल.

त्याच वेळी, मिनसोटा विद्यापीठाचे प्राध्यापक मायकेल ऑस्टरहोम म्हणतात की या व्हायरसच्या परिणामाबद्दल खरी माहिती पुढील काही आठवड्यात उपलब्ध होईल. ते म्हणाले, 'आम्ही नुकतीच सुरुवात केली आहे. जर हे जगभर पसरले तर ते 1918 च्या महामारीपेक्षाही हा आजार भयानक वाढेल, सोबतच लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागेल.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News