जाणुन घ्या मुरूम व पुटकुळ्या येण्यामागचे कारण

डॉ. धनश्री भिडे, त्वचारोगतज्ज्ञ
Saturday, 7 September 2019

वयात येताना शरीरातील अंतः स्रावात होणाऱ्या बदलामुळे मुरूम व पुटकुळ्या येऊ लागतात. तैलग्रंथीचे तोंड बंद झाल्याने या ग्रंथीमधून निर्माण होणारे तेल आत साचून राहते. पर्यायाने या ग्रंथीचा आकार वाढतो. मुरमे तयार होतात. त्याची तीव्रता कमी-अधिक असू शकते.

वयात येताना शरीरातील अंतःस्रावात होणाऱ्या बदलामुळे मुरूम व पुटकुळ्या येऊ लागतात. तैलग्रंथीचे तोंड बंद झाल्याने या ग्रंथीमधून निर्माण होणारे तेल आत साचून राहते. पर्यायाने या ग्रंथीचा आकार वाढतो. मुरमे तयार होतात. त्याची तीव्रता कमी-अधिक असू शकते. काही वेळा फक्त ब्लॅक हेड अथवा व्हाइट हेडचा त्रास होतो. यात लालसर अथवा पिवळे फोड येण्याचे प्रमाण कमी असते. मुरुमांचा त्रास अधिक तीव्र प्रमाणात असणाऱ्या रुग्णांमध्ये मोठ्या गाठी तयार होतात. चेहऱ्याप्रमाणेच हे फोड पाठीवर अथवा दंडावर येऊ शकतात. 

मुरूम येणे हा शरीरात होणाऱ्या नैसर्गिक बदलांचा परिणाम आहे. त्याला आपण तारुण्यपीटिका असे संबोधतो. मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे व अंडाशयाला सूज आल्याने काही रुग्णांमध्ये उतारवयातही फोड आलेले आढळतात. पौगंडावस्थेमध्ये प्रवेश करताना सुरू होणारा हा बदल स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीच्या काळापर्यंत सुरू राहू शकतो. यामागे अंतःस्रावातील असंतुलन हे मूलभूत कारण असले तरी काही इतर कारणे आहेत. 

यात प्रामुख्याने इतर आजारांसाठी घेण्यात येणारी औषधे (संतती प्रतिबंधक गोळ्या, क्षयरोगावरील औषधे, स्टिरॉड्‍स, ब जीवनसत्त्व इ.), सौंदर्यप्रसाधने, शरीरसौष्ठत्वासाठी वापरण्यात येणारी औषधे व प्रथिने यांचा समावेश आहे. अधिक उष्मांक असलेले पिष्टमय पदार्थ, मैद्याच्या व गोड पदार्थांचे सेवन केल्याने काही व्यक्तींना मुरमे येतात. शरीरावरचे अनावश्यक केस काढण्यासाठी वॅक्सिंग केल्यानंतर तीनचार दिवसांनी त्या भागावर पुन्हा फोड येऊ शकतात. पाठ व दंडावर याचे प्रमाण अधिक आढळून येते. दमट व उष्ण हवामानात प्रवासाला गेल्यावर हा त्रास होऊ शकतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News