उंदेरी किल्ला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 19 August 2020
  • खांदेरी बेटाशेजारीच साधारण अर्धा किमी अंतरावर उंदेरी बेट आहे.
  • साधारणत तेथील भूप्रदेश खांदेरीप्रमाणेच आहे.
  • किल्ल्याची तटबंदी शाबूत आहे पण पाण्याचे दुभिक्ष्य आहे.

खांदेरी बेटाशेजारीच साधारण अर्धा किमी अंतरावर उंदेरी बेट आहे. साधारणत तेथील भूप्रदेश खांदेरीप्रमाणेच आहे. किल्ल्याची तटबंदी शाबूत आहे पण पाण्याचे दुभिक्ष्य आहे. खांदेरीप्रामाणेच उंदेरीही मुंबई पोर्ट टस्टच्या ताब्यात असल्याने येथे ही त्यांच्या परवानगीनेच जाता येते. कोळ्यांच्या छोट्या होडीतून थळ किनाऱ्यावरून या किल्ल्यात जाता येते. उंदेरी किल्ल्यावर उतरण्याकरिता ईशान्येस बोट लावावी लागते.

तत्कालीन इतिहासात महत्व होते ते उंदेरीपेक्षा खांदेरीलाच. खांदेरीवर हल्ले चढवत असतानाच सिध्दी कासमने १६८० साली बेट ताब्यात घेऊन त्यावर किल्ला बांधला. १७६२ साली सखोजी आंग्रेंनी किल्ल्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. परंतु हा किल्ला सिद्यीकडून विकत घेतल्याचे सांगितल्यामुळे शाहू यांनी आंग्रे यांना हा किल्ला विकत घेण्यास सांगितले. १७३६ मध्ये चिमाजी आप्पा आणि मानाजी आंग्रे यांच्या सिद्यीबरोबर झालेल्या लढाईत उंदेरीचा सुभेदार सिद्यी याकुब मारला गेला.

पुढे मराठे आणि सिद्यी यांच्यात चकमकी होतच होत्या. १७५८ मध्ये तुकोजी आंग्रे यांनी रामाजी महादेव आणि महादजी रघुनाथच्या मदतीने तसेच १७५९ मध्ये नानासाहेब पेशवे आणि सरखेल आंग्रेंनी लढाई केली. १७६० मध्ये पेशवे यांचे आरमार सुभेदार नारो त्र्यंबक यांनी हा किल्ला जिंकून घेतला. १८४० नंतर मात्र उंदेरी कायमचा इंग्रजांच्या ताब्यात गेला.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News