सरकारच्या ‘या’ योजनेच्या अंतर्गत, दर महिन्याला मिळतील हजारो रूपये

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 August 2020
  • कुटुंबात कमावणारी व्यत्की एकच असली आणि पत्नी गृहिणी असली तर घर चालवण्यास अनेक अडचणी येत असतात.
  • परंतु आता केंद्र सरकारच्या या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही ही समस्या सोडवू शकतात.

कुटुंबात कमावणारी व्यत्की एकच असली आणि पत्नी गृहिणी असली तर घर चालवण्यास अनेक अडचणी येत असतात. परंतु आता केंद्र सरकारच्या या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही ही समस्या सोडवू शकतात. सोबतच आपल्या पत्नीला आत्मनिर्भर बनवू शकता. यासाठी सरकारच्या राष्ट्रीय पेंशन योजनेत (एनपीएस) गुंतवणूक करता येईल.

पत्नीच्या नावाने उघडा नवीन पेंशन सिस्टम खाते :-

पत्नीच्या नावाने राष्ट्रीय पेंशन योजनेत नविन खाते खोलू शकतात. एनपीएस खाते तुमच्या पत्नीला 60 वर्ष पुर्ण झाल्यावर संपुर्ण रक्कम देईल. सोबतच पेंशन स्वरूपात दर महिन्याला देखील काही रक्कम मिळेल. तुमच्या पत्नीला महिन्याला किती रक्कम मिळावी हे देखील तुम्ही निश्चित करू शकता. यामुळे पत्नीला वयाच्या ६० वर्षानंतर कोणावर अवलंबून राहावे लागणार नाही.

गुंतवणूक :-

या खात्यात तुम्ही तुमच्या सुविधेनुसार दर महिन्याला किंवा वर्षाला रक्कम जमा करू शकता. १००० रुपये भरून देखील खाते उघडता येईल. ६० वर्षात हे खाते मॅच्युअर होते. नवीन नियमांनुसार तुम्ही वयाची अट ६५  देखील करू शकतात.

कोण उघडू शकते खाते ?

एनपीएसमध्ये १८  ते ६० वयोगटातील कोणीही खाते उघडू शकते. यात Tier-I आणि Tier-II अशी दोन खाती आहेत. Tier-I एक निवृत्ती खाते आहे. हे खाते प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याने उघडणे अनिवार्य आहे. Tier-II वॉलेंटरी खाते आहे. ज्यात कोणीही पगार घेणारी व्यक्ती गुंतवणूक करू शकते आणि कधीही पैसे काढू शकते.

महिन्याला ६०  हजार रुपयांचे पेंशन कशी मिळेल ?

जर तुम्ही वयाच्या २५ व्या वर्षी हे खाते उघडल्यास ६० वर्षांपर्यंत म्हणजे पुढील ३५  वर्ष तुम्हाला ५ हजार रुपये महिन्याला जमा करावे लागतील. तुमच्याकडून जवळपास २१ लाख रुपये जमा होतील. या एकूण रक्कमेवर अंदाजे ८  टक्के परतावा मिळाल्यास, एकूण राशी १.१५  कोटी रुपये होईल. यातून ८० टक्के रक्कमेतून एन्युटी (वार्षिकी दर) खरेदी केल्यास मुल्य ९३ लाख रुपये होईल. लम्प सम किंमत देखील २३ लाख असेल. एन्युटी रेट ८ टक्के असल्यास वयाच्या ६० वर्षानंतर प्रत्येक महिन्याला ६१ हजार रुपये पेंशन मिळेल. याशिवाय २३ लाख रुपयांचा फंड देखील मिळेल.

महाराष्ट्र मुंबई भारत

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News