विश्‍वकरंडक १७ वर्षांखालील फुटबॉल २०२१ मध्ये सुरू

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 15 August 2020
  • विश्‍वकरंडक १७ वर्षांखालील मुलींच्या फुटबॉल स्पर्धेतील पात्रता स्पर्धा शिल्लक असल्याने भारतातील नोव्हेंबरमधील स्पर्धा लांबणीवर पडली होती.
  • आता हा प्रश्‍न पुन्हा येऊ नये यासाठी युरोपातील पात्र संघ क्रमवारीनुसार निश्‍चित करण्याचे ठरले.

मुंबई :- विश्‍वकरंडक १७ वर्षांखालील मुलींच्या फुटबॉल स्पर्धेतील पात्रता स्पर्धा शिल्लक असल्याने भारतातील नोव्हेंबरमधील स्पर्धा लांबणीवर पडली होती. आता हा प्रश्‍न पुन्हा येऊ नये यासाठी युरोपातील पात्र संघ क्रमवारीनुसार निश्‍चित करण्याचे ठरले.

युरोपातील १७ वर्षांखालील मुलींच्या क्रमवारीनुसार भारतातील स्पर्धेसाठी गतविजेते स्पेन, इंग्लंड आणि जर्मनी यांना पात्रता देण्यात आली. युरोपातील पात्रता स्पर्धेचा अंतिम टप्पा कोरोना महामारीमुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मानांकन लक्षात घेऊन तीन संघ निश्‍चित करण्यात आले आहेत. ही स्पर्धा नव्या कार्यक्रमानुसार १७ फेब्रुवारी ते ७ मार्चदरम्यान होणार आहे. अंतिम लढत नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगणार आहे.

भारतात होणारी ही स्पर्धा एकंदर १६ संघांची असेल. त्यासाठी यजमान भारतासह आशिया विभागातून उत्तर कोरिया, जपान आणि ओशियानातून न्यूझीलंड पात्र ठरले आहेत. त्यापाठोपाठ युरोपातील स्पेन, इंग्लंड, जर्मनीने पात्रता साध्य केली आहे. या स्पर्धेतील अजून नऊ संघ पात्र ठरणे शिल्लक आहे. आफ्रिका, कॉनकॅफ आणि दक्षिण अमेरिका या विभागातील प्रत्येकी तीन संघ या स्पर्धेस पात्र ठरणार आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News