युजीसी करणार परीक्षेबाबत मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 24 June 2020

मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया, डेंटल काऊन्सिल ऑफ इंडिया या संस्थांना विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन परीक्षा प्रोजेक्टस करण्यास सांगितले होते. काही शैक्षणिक संस्थांनी याला पुर्णपणे विरोध केला. 

केंद्र सरकार आणि राज्य सरकारडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्या परीक्षा रद्द केल्या आणि परीक्षा न घेता पदवी देण्याचा सरकारचा विचार सुरू आहे. काही शिक्षण परिषदांनी आक्षेप घेतला असून परीक्षा न घेताच पदवी दिल्यास कायद्याचे उल्लघंन होईल. या संदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे विद्यापीठ अनुदान आयोग जारी करणार आहे. 

नवीन मार्गदर्शक तत्त्वे विद्यापीठ अनुदान आयोग यावर विचार करत असून यासंदर्भात माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांची अधिक संख्या असलेल्या संस्था परीक्षा असमर्थ असल्याचे सांगत आहेत. युजीसीने कोरोना साथीच्या काळात महाविद्यालयीन परीक्षा कशा आयोजित कराव्यात याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आले होते. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक होत असल्याने त्या नियमावलीत बदल करण्यात आले. 

मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया, डेंटल काऊन्सिल ऑफ इंडिया या संस्थांना विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन परीक्षा प्रोजेक्टस करण्यास सांगितले होते. काही शैक्षणिक संस्थांनी याला पुर्णपणे विरोध केला. 

लॉकडाउनचा शिक्षणावर मोठा परीणाम झाला असून पालक आणि विद्यार्थी चिंतेत आहेत. मार्गदर्शक तत्त्वे विद्यापीठ अनुदान यांनी काही विद्यापीठांना मार्गदर्शन करण्यास सुरूवात केली आहे. परीक्षा तीन तासांवरून २ तास करावी. तसेच परीक्षा ऑनलाईन घेण्यात यावी असे सांगण्यात आले होते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News