सर्वोच्च न्यायालयात युजीसीने केले प्रतिज्ञापत्र दाखल; वाचा काय म्हटलंय प्रतिज्ञापत्रात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 13 August 2020

राज्य सरकारने दिलेल्या प्रतिज्ञापत्रावर युसीजीने उत्तर द्यावे असा आदेश सर्वोंच्च न्यायलयाने युजीसीला दिला.

नवी दिल्ली :  विद्यापीठ अनुदान आयोगाने आज गुरुवारी (ता.१३) सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यात म्हटलं आहे की, विद्यापीठ अनुदान आयोग एक स्वायंत संस्था आहे. त्यांना निर्णय घेण्याचे स्वतंत्र अधिकार आहेत. विद्यापीठांच्या परीक्षा आयोजिक करण्याची जबाबदारी युजीसीला आहेत राज्य सरकरची नाही. सप्टेंबरपर्यंत विद्यापीठांनी परीक्षा आयोजित करुन विद्यार्थ्यांचे हित जोपासावे असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.    

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करुन अंतर्गत मुल्यांकनाद्वारे विद्यार्थ्यांना गुणदान देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला विद्यापीठ आनुदान आयोगाने विरोध केला. आणि विद्यापीठांना सप्टेंबरपर्यंत अंतिम वर्षाच्या परीक्षा आयोजिक करण्याचा आदेश दिला. या आदेशाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. विद्यार्थ्यांना पदवी देण्याचे अधिकार युजीसीला आहे तसे परीक्षा घेण्याचे अधिकार सुद्धा आहे. परीक्षा घ्यायचा की, नाही हा निर्यण युजीसीचा आहे राज्य सरकारला यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही असा युक्तीवाद सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी केला.

दिल्ली आणि महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या संसर्गामुळे पदवी परीक्षा रद्द केली आणि सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. राज्य सरकारने दिलेल्या प्रतिज्ञापत्रावर युसीजीने उत्तर द्यावे असा आदेश सर्वोंच्च न्यायलयाने युजीसीला दिला. युजीसीने उत्तर देण्यासाठी तीन दिवसाचा अतिरीक्त कालावधी मागीतला होता दिन दिवसानंतर आज युजीसीने उत्तरादाखल प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले. विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याच्या निर्यणयावर ठाम असल्याचे प्रतिज्ञापत्रात सांगण्यात आले. यावर उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News