परीक्षा संदर्भात युजीसीकडून सुधारित स्टॅंन्डीग ऑपरेटिंग प्रोसिजर जाहीर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 11 July 2020

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर परीक्षा आयोजित करण्यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन तत्वे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी जाहीर केले.

नवी दिल्ली : अनेक दिवसांपासून रखडलेल्या पदव्युत्तर, पदवी, पदविका परीक्षांचा मार्ग शुक्रवारी (ता.11) मोकळा झाला. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर परीक्षा आयोजित करण्यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन तत्वे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी जाहीर केले. विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत स्टॅंन्डीग ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) तयार करण्यात अली. त्याविषयी पोखरियाल यांनी अधिक माहिती दिली.

'कोरोनाच्या पार्श्वभुमीवर विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षितता लक्षात घेऊन परीक्षांचे आयोजन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास केला, त्यांना न्याय दिला पाहीजे, त्याचबरोबर संर्वांना समान संधी देणे गरजेचे आहे. अनेक विद्यार्थ्यांना पदवी घेऊन भविष्यात प्रगती करायची आहे. त्यामुळे परीक्षा महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी खबरदारीचा उपाय योजना आखण्याचे आदेश दिले आहेत' असे पोखरियाल यांनी सांगितले.  मात्र 'राज्यात कोरोनाची परिस्थिती पाहता परीक्षा घेणे शक्य नाही' असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सावंत यांनी युजीसीला पत्राद्वारे कळवले होते. त्यावर आणखी कोणतेही उत्तर युजीसी कडून आले नाही.

राज्य सरकारने सर्व परीक्षा रद्द करुन सरासरी मुल्यांकनावर निकाल लावण्याचे निर्देश अकृषी विद्यापीठांना दिले होते. त्यामुळे विद्यार्थांनी सुटकेचा श्वास सोडला. मात्र युजीसीने पुन्हा परीक्षा घेण्याचे आदेश विद्यापीठाला दिले त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत. दिसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत आहे अशा परिस्थितीत परीक्षा कशा होणार यामुळे विद्यार्थी चिंतीत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरु केले. लॉकडाऊन काळात सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे बंद करण्यात आली. सर्व शाळा, महाविद्यालये नक्की केव्हा सुरु होतील हे सांगने कठीण आहे. कारण दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. सध्यातरी कोणतीही प्रभावशाली लस कोरोनावर उपलब्ध नाही. त्यामुळे महाविद्यालय सुरु होण्याची चिन्हे दिसत नाही. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News