कारशेड आरेतच, अहवाल समितीमुळे वाढणार उद्धव ठाकरेंची डोकेदुखी... 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 29 January 2020

जेव्हा मुंबई उच्च न्यायालयाने वृक्षतोडीवरील बंदी उठवताच मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन लिमिटेडने रात्रीत आरे काॅलनीतील २,१८५ पैकी २,१४१ झाडं कापून टाकली होती. आणि यानंतर मोठा गोंधळ मजला होता. 

मुंबई : 'कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो' हा मार्ग मुंबई मेट्रोतील पाहिला भुयारी मार्ग असून, या प्रकल्पासाठी आरे कॉलनीमध्ये कार शेड बनविण्यात येणार आहे. गेल्या वर्षी विद्यार्थ्यांनी आरेमध्ये कारशेड बनवू नये यासाठी मोठ्या प्रमाणात आपला विरोध दर्शवला होता. प्रसंगी विद्यार्थ्यांनी मारही खाल्ला होता. पर्यावरणप्रेमींनीहि आपला निषेध वर्तविला होता. या वेळी शिवसेनेने युतीत असताना देखील विध्यार्थ्यांना पाठिंबा दाखवून आरे कारशेड बनविण्यासाठी आपणहून विरोध केला होता. जेव्हा मुंबई उच्च न्यायालयाने वृक्षतोडीवरील बंदी उठवताच मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन लिमिटेडने रात्रीत आरे काॅलनीतील २,१८५ पैकी २,१४१ झाडं कापून टाकली होती. आणि यानंतर मोठा गोंधळ मजला होता. 

मात्र आता महाविकास आघाडीचे सरकार आले आणि स्वतः उद्धव ठाकरेंनी या सरकराची धुरा हाती घेतली. आरेमधील मेट्रो कारशेड इतरत्र हलवण्यासाठी समिती बनविली होती. या समितीने अहवाल उद्धव ठाकरेंच्या हाती सोपवला आहे. अहवालात कारशेड इतर ठिकाणी हलवणं व्यवहार्य नसेल असे समितीने मांडल आहे. त्यामुळे पर्यावरण प्रेमींच्या बरोबरीने कारशेडला विरोध करणाऱ्या शिवसेनेची दोखेदुखी वाढणार आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News