लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी परीक्षा रद्द - उदय सामंत 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 9 July 2020

लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी, भवितव्यासाठी महाराष्ट्र सरकारने परीक्षा रद्द केली होती. सप्टेंबर महिन्यापर्यंत विद्यार्थ्यांना संभ्रमावस्थेत ठेवता येणार नाही.

लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी परीक्षा रद्द - उदय सामंत 

लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी, भवितव्यासाठी महाराष्ट्र सरकारने परीक्षा रद्द केली होती. सप्टेंबर महिन्यापर्यंत विद्यार्थ्यांना संभ्रमावस्थेत ठेवता येणार नाही. आता अजून विद्यार्थ्यांच्या संभ्रमावस्थेत भर पडली आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून आम्ही परीक्षा रद्द केल्या होत्या, असं मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं. 

विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून राज्य सराकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच सप्टेंबर महिन्यापर्यंत विद्यार्थ्यांना संभ्रमावस्थेत ठेवता येणार नाही. याबाबत ६ एप्रिलला पहिली बैठक झाली होती. या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा कशा घ्यायच्या याचा विचार विनिमय करण्यासाठी सहा कुलगुरूंची एक समिती तयार करण्यात आली होती. तयार केलेल्या समितीचे डॉ. सुहास पेडणेकर हे प्रमुख होते. त्यावेळी युजीसीच्या काही सुचना आल्या. त्यामध्ये करोनाच्या परिस्थितीत तिथल्या शासनानं निर्णय घ्यावा असं सामंत यांनी सांगितलं. 

त्यानंतर कुलगुरू ठरवतील त्याप्रमाणे राज्य सरकार करेल यावर सहमत झालं. विचारविनिमय करून ६ मे रोजी समितीने आपला अहवाल सादर केला. लगेच यासंदर्भात राज्यपालांशी आम्ही चर्चा करून शासनानं समितीचा अहवाल स्वीकारला. त्यानंतर १७ मे ला उदय सामंत यांनी यूजीसीला अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची विनंती केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील पंतप्रधानांना पत्र लिहून परीक्षा रद्द करण्याची विनंती केली होती. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News