यूएईच्या पंतप्रधानांची बायको 271 कोटी घेऊन पळाली; कोण आहे राणी हया आणि का पळाली ?

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Thursday, 11 July 2019
  • यूएईच्या पंतप्रधानांची बायको पळाली
  • 271 कोटी घेऊन राणीचा पोबारा 
  • सहाव्या पत्नीनं अरबपती नवऱ्याला लावला चुना

सुंदर बायकांनी पतीला चुना लावून पळ काढल्याचे अनेक प्रसंग आपण हिंदी सिनेमात पाहिलेत. पण यूएईच्या पंतप्रधानांना प्रत्यक्ष याची अनुभूती आलीय. या राणींनं 271 कोटींसह पोबारा केलाय.ती नवऱ्याला लावला चुना

संयुक्त अरब अमिरातीचे पंतप्रधान आणि दुबईतले अरबपती शेख मुहम्मद बिन राशिद अल मकतूम यांच्या डोकं आपटून घेण्याची वेळ आलीय. कारण त्यांची पत्नी पळून गेलीय, होय...या महाशयांची पत्नी राणी ह्यानं दुबईतून पळ काढलाय. बरं जातांना राणीसाहेब रिकाम्या हातानं गेलेल्या नाहीत. आपल्या अरबपती नवऱ्याच्या तिजोरीतून 271 कोटींवर त्यांना हात साफ केलाय. इतकच नाही तर दोन मुलांनाही सोबत घेतलंय. 

कोण आहे राणी हया आणि का पळाली?

राणी हया संयुक्त अरब अमिरातचे पंतप्रधान शेख मुहम्मद बिन राशिद अल मकतूम यांची सहावी पत्नी आहे. या दोघांना दोन मुलं देखील आहेत. राणी हया ही जॉर्डनचे राजा अब्दुलाह यांची सावत्र बहिण आहे. मागील काही दिवसांपासून पती–पत्नीमध्ये वाद सुरू होते. त्यामुळे राणी हयानं जर्मनीमध्ये आश्रय घेतला असावा अशी माहिती समोर येतीय.

 राणी हयाला दुबईतून बाहेर पडण्यासाठी जर्मन दुतावासानं मदत केली असण्याची शक्यता आहे. पत्नी पळून गेल्यानंतर शेख मुहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी जर्मनीला फोन करून पत्नीला परत देण्यास सांगितलं. पण, जर्मनीनं या प्रकरणात कोणतीही मदत करण्यास नकार दिलाय. एका पंतप्रधानांच्या पत्नीनंच पतीलाच चुना लावल्यानं चर्चा तर होणारंच...
 

Tags

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News