अमिरातीत आयपीएल बीसीसीआयच्या ‘या’ विभागाचे काम वाढले

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 27 July 2020
  • मिरातीमध्ये होणाऱ्या आयपीएलवर लक्ष ठेवणे हे भारतीय क्रिकेट मंडळाच्या लाचलुचपत प्रतिबंधक (अँटी करप्शन विभाग) विभागासाठी आव्हानात्मक असणार आहे; परंतु सामने तीन स्टेडियमवर होणार असल्याने लक्ष देणे तुलनेने सोपे असेल, असे या विभागाचे प्रमुख अजित सिंग यांनी सांगितले.

नवी दिल्ली :- अमिरातीमध्ये होणाऱ्या आयपीएलवर लक्ष ठेवणे हे भारतीय क्रिकेट मंडळाच्या लाचलुचपत प्रतिबंधक (अँटी करप्शन विभाग) विभागासाठी आव्हानात्मक असणार आहे; परंतु सामने तीन स्टेडियमवर होणार असल्याने लक्ष देणे तुलनेने सोपे असेल, असे या विभागाचे प्रमुख अजित सिंग यांनी सांगितले.

बहुचर्चित यंदाची आयपीएल १९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. ५१ दिवसांत होणारे ६० सामने दुबई, शारजा आणि अबुधाबी येथे होणार आहेत.

भारतात आयपीएलचे सामने साधारणत: आठ स्टेडियमवर होत असतात; पण अमिरातीत तीनच स्टेडियमवर सामने होणार आहेत. एकदा का वेळापत्रक जाहीर झाले की आम्ही मोर्चेंबांधणी तयार करू, असे अजित सिंग यांनी सांगितले.
बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात आम्ही सात अधिकारी आहोत. तीन स्टेडियमवर आणि त्यावर होणारे ६० सामने यावर लक्ष ठेवण्यास आम्ही पुरेसे आहोत. मैदानाबरोबर आमचे लक्ष खेळाडू राहणाऱ्या हॉटेलवरही असणार आहे, असे अजित सिंग म्हणाले.

आमची व्यूहरचना कशी असेल, याबाबत आम्ही आत्ताच काही संकेत देणार नाही. जैवसुरक्षा रचना कशी केली जाईल, त्यानुसार आम्ही रचना करणार आहोत आणि गरज पडलीच तर आम्ही काही अधिकारी भाडेतत्त्वावरही घेऊ शकतो. आयसीसीचे मुख्यालयही दुबईत आहे. गरज लागली तर आयसीसीचेही सहाकार्य घेतले जाईल, असे अजित सिंग यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News