बॉलीवूड आणि टॉलीवूडमधील 'हे' दोन सुपरस्टार दिसणार एकत्र पडद्यावर 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 7 July 2020

बॉलिवूड स्टार हृतिक रोशन आणि दक्षिण अभिनेता प्रभास  यांच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे.

बॉलिवूड स्टार हृतिक रोशन आणि दक्षिण अभिनेता प्रभास  यांच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. 'तानाजी द अनसंग योद्धा' दिग्दर्शक ओम राऊत यांच्या अ‍ॅक्शन फिल्ममध्ये हे दोन्ही अभिनेते आपली कला दाखवताना दिसतील अशी माहिती आहे. तथापि, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. ही बातमी खरी ठरल्यास सुपरस्टार हृतिक रोशन आणि दक्षिण सुपरस्टार प्रभास एकत्र पडद्यावर दिसण्याची ही पहिली वेळ असेल.

मिळालेल्या माहितीनुसार निर्माता-दिग्दर्शक लवकरच या चित्रपटासंदर्भात अधिकृत घोषणा करणार आहेत. त्याचवेळी असे म्हटले जात आहे की या मेगा बजेट चित्रपटासाठी प्रभासने आपली संमती दिली आहे, तर हृतिक रोशनशी अजूनही संभाषण सुरू आहे. पॅन-इंडियाच्या धर्तीवर हा चित्रपट बनणार आहे.

साऊथ स्टार प्रभासच्या आधीच्या रिलीज झालेल्या ‘साहो’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ होती, पण हिंदी बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने चांगली कामगिरी केली नाही. या चित्रपटाकडून  चाहत्यांना अनेक अपेक्षा होत्या. असे असूनही या चित्रपटाने 100 कोटींच्या वर कमाई केली. या चित्रपटा नंतर प्रभास आता त्याच्या पुढच्या चित्रपटात व्यस्त आहे. ज्यामध्ये तो  अभिनेत्री पूजा हेगडे सोबत दिसणार आहे.

 

हृतिक रोशनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलताना, त्याचे मागील वर्षी सुपर सुपर 30 आणि 'वॉर' या दोन सुपरहिट चित्रपटांचे रिलीज झाले. दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. 'वॉर'ने 317 कोटी रुपयांची कमाई केली होती. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात टायगर श्रॉफ आणि वाणी कपूर देखील आहेत. टायगर आणि हृतिकची अॅक्शन लोकांना खूप आवडली. हृतिकच्या आगामी चित्रपटांपैकी क्रिश-३ हा चित्रपट कधी येणार याची पुष्टी झालेली नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News