बेनेट विद्यापीठाचे दोन नवे कोर्सेस; हमखास मिळेल नोकरी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 19 July 2020

भविष्यात इंटरनेचा वापर वाढणार आहे, त्यामुळे उद्योगांना हवे असलेले कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसीत करण्याचे काम बेनेट विद्यापीठ करत आहे. 

मुंबई : भविष्याची पावले ओळखून बेनेट विद्यापीठाने बीसीएच्या दोन नव्या कोर्सेसची निर्मिती केली. बॅच्यूलर ऑफ कंम्प्युटर आप्लिकेशन डाटा सायन्स (BCADS) आणि क्लाउड कम्प्युटींग सायबर सिक्युरिटी (BCACCSS) हे दोन कोर्सेस येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरु होणार आहेत. इंटरनेटने देशात प्रचंड क्रांती केली. प्रामुख्याने आयटी आणि औद्योगिक क्षेत्रात इंटरनेटने मोठा बदल केला. भविष्यात इंटरनेचा वापर वाढणार आहे, त्यामुळे उद्योगांना हवे असलेले कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसीत करण्याचे काम बेनेट विद्यापीठ करत आहे. 

माहितीचा खजीना

कोणत्याही उद्योगाचा खजीना डेटा असतो. डेटा महत्त्वाची भुमीका बजावत असतो. कंपनीने गोळा केलेल्या डेटावर भविष्याचे नियोजन केले जाते. तंत्रज्ञान जस बदलत जाते त्याप्रमाणे डेटाची पुनर्मांडणी करावी लागते. त्यासाठी डेटाचे अद्यावत ज्ञान असणे आवश्यक आहे. अनेक वेळा कंपनीचा महत्त्वपुर्ण डेटावर सायबर हल्ले होतात, डेटा चोरण्याची शक्यता असते. सायबर हल्ल्यापासून सुरक्षा करण्यासाठी सायबर सिक्युरिटी महत्त्वाची भुमीका बजावत असते. अधुनिक काळात वेगवेगळ्या प्रकारे डेटा चोरण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यांना आळा बसवण्यासाठीचे नवे तंत्र कोर्सेसमध्ये शिकवले जाणार आहे.    

या कोर्सेसमध्ये विद्यार्थ्यांना डेटा सायन्स, सायबर स्पेस, वेब तंत्रज्ञान, क्लाउड कम्प्युटींग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे प्रमाणपत्र कोर्सेस शिकवले जाणार आहेत. दरवर्षी एक कोर्स आणि प्रत्यक्ष कंपनीमध्ये प्रशिक्षण देण्याची योजना आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कंपनीचा कोणताही एक विभाग विना प्रशिक्षण देता सांभाळता येईल.    बेनेट विद्यापीठाकडून सुरु करण्यात येणाऱ्या नवीन कोर्सेसची अधिक माहती मिळवण्यासाठी www.bennetwww.bennett.edu.in/admission/programs/bca/ या संकेतस्थळाला भेट द्या किंवा १८००१०३८४८४ या नंबर संपर्क करा. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News