मुंबई आयआयटीच्या दोन विद्यार्थ्यांनी शोधला लघुग्रह

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 August 2020
  • आयआयटी मुंबई येथे शिक्षण घेत असलेल्या कृती शर्मा आणि कुणाल देशमुख ह्या दोन विद्यार्थ्यांनी पृथ्वीपासून सर्वात जवळ अंतरावर असलेल्या एका नव्या लघुग्रहाचा शोध लावला आहे.
  • हा लघुग्रह पृथ्वीपासून अवघ्या २९५० किलोमीटर अंतरावर आढळला आहे.

मुंबई :- आयआयटी मुंबई येथे शिक्षण घेत असलेल्या कृती शर्मा आणि कुणाल देशमुख ह्या दोन विद्यार्थ्यांनी पृथ्वीपासून सर्वात जवळ अंतरावर असलेल्या एका नव्या लघुग्रहाचा शोध लावला आहे. हा लघुग्रह पृथ्वीपासून अवघ्या २९५० किलोमीटर अंतरावर आढळला आहे. आयआयटी बॉम्बे येथील विद्यार्थ्यांनी लघुग्रहावर केलेल्या संशोधनावर आंतरराष्ट्रीय प्रकल्प संशोधकांनीही शिक्कामोर्तब केला आहे. आंतराराष्ट्रीय पातळीवर पृथ्वीलगत असणाऱ्या नीअर अर्थ आणि मेन बेल्ट अश्या स्तरांमधील संशोधनाचे काम नेहमी सुरु असते. या संशोधन प्रकल्पाला 'झेडटीएफ' या नावाने ओळखले जाते. झेडटीएफ या संशोधन प्रकल्पाला नॅशनल सायन्स फाउंडेशनकडून अनुदान दिले जाते. या संशोधन प्रकल्पात तैवान, भारत या देशातील संघांचा समावेश आहे. 

केलिफोर्निया देशात असलेल्या दुर्बिणीतून अंतराळात होणारी निरीक्षणे नोंदवली जातात आणि अंतराळात होणाऱ्या हालचालींचे तसेच त्यावर केलेल्या निरीक्षणांचे विश्लेषण, संशोधन प्रकल्पात कार्यरीत असणाऱ्या संघांकडून केले जाते अशी माहिती आयआयटी बॉम्बेचे सल्लागार प्राध्यापक वरूण भालेराव यांनी दिली आहे. 

आयआयटी बॉम्बे येथे शिकणाऱ्या मेट्रोलॉजि आणि मटेरियल सायन्स विभागातील शेवटच्या वर्षात शिकणारा विद्यार्थी कुणाल देशमुख आणि मेकॅनिकल इंजिनीरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणारी विद्यार्थिनी कृती शर्मा हे दोन विद्यार्थी गेल्या एक वर्षांपासून या संशोधनावर काम करीत होते. आयआयटी येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना रोबोटिक झेडटीएफ कडून घेण्यात आलेल्या छायाचित्रांचा अभ्यास करत असताना हा लघुग्रह त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर १६ ऑगस्ट रोजी कुणाल आणि कृतीने  त्यांनी शोधलेल्या लघुग्रहाची माहिती झेडटीएफला दिली. त्यानंतर मंगळवारी सर्व संस्थांकडून या माहितीला पुष्टी देण्यात आली. झेडटीएफच्या टीमने लघुग्रहाबाबत मिळालेली माहिती पुढे इंटरनॅशनल अँस्ट्रोनॉमिकल यूनियन प्लॅनेट सेंटरला कळवली आहे. तसेच आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांनी शोधलेल्या लघुग्रहा विषयी अधिक माहिती गोळा केली जात आहे. कुणाल देशमुख आणि कृती शर्मा या दोन विद्यार्थ्यांनी शोधलेल्या या लघुग्रहाला "२०२० क्युझी" असे नाव देण्यात आले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News