कोरोनाच्या दोन लसी 'या' महिन्यात येणार ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 30 August 2020

कोरोनाच्या दोन लसी 'या' महिन्यात येणार ?

कोरोनाच्या दोन लसी 'या' महिन्यात येणार ?

कोरोनानं अवघ्या जगाचं कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे कोरोना आजारावर केव्हा लस तयार होईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. अशातचं अनेक देशांनी तयार केलेल्या लसीच्या मानवी चाचण्या सुरू केल्या आहेत. त्यातचं रशियानं सुध्दा एक लस आणली आहे, ते ऑक्टोबर महिन्यात उपलब्ध होईल असा अंदाज आहे.

सध्या भारतात एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे भारतात २०२१ सुरूवातीला दोन लस भारतात उपलब्ध होतील असा अंदाज व्यक्त केला जातोय, बर्नस्टेन यांनी एका अहवालात दिलेल्या माहितीनुसार जागतिक स्तरावर फेब्रुवारी-मार्च पर्यंत 4 लशी उपलब्ध होतील. ‘एस्ट्राजेनेका व ऑक्सफोर्ड व्हायरल वेक्टर लस आणि नोवावॅक्सची प्रोटीन सब्यूनिट दोन लससाठी भारताने भागिदारी केली आहे.

या दोन चाचणीचा मानवावरती यशस्वी प्रयोग झाला आहे. त्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची क्षमता आणि सुरक्षितता असल्याचे सांगितले जात आहे. या लसी मार्च महिन्यात येण्याची शक्यता आहे. येणा-या लसीची किंमत साधारण २२५ ते २५० रूपये असू शकते. सीरम इंस्टिट्यूट साधारण 2021मध्ये 60 कोटी तर 2022 पर्यंत एक अब्ज लशीचं उत्पादन होऊ शकतं अशी माहिती अहवालातून समोर आली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News