ट्विटर वार: बॉलिवूड कलाकार आणि क्रिकेटर समोरासमोर भिडले

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 26 September 2020

बॉलिवुडच्या कलाकारांनी अनुष्काला समर्थन दिले तर सुनील गावस्करांना खडेबोल सुनावले. गावस्कर यांच्यावरुन क्रिकेटर आणि बॉलिवूड यांच्यात वादाची ठिणगी पडली, दोन्ही बाजूचे फॅन एकमेकांच्या विरोधात ट्विट करत आहेत, हे ट्विटर वार चांगलेच रंगले होते. 

मुंबई : रॉयल चॅलेंजर संघाचा कप्तान विराट कोहली यांच्या खराब कामगिरीवर भारताचा माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी निशाना साधला. कॉमेन्ट्री करताना गावस्करने अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे नाव घेतले, त्यामुळे सोशल मीडियात सुनील गावस्कर ट्रोल झाले. अनुष्का शर्माने गावस्करांचा चांगलाच समाचार घेतला. बॉलिवुडच्या कलाकारांनी अनुष्काला समर्थन दिले तर सुनील गावस्करांना खडेबोल सुनावले. गावस्कर यांच्यावरुन क्रिकेटर आणि बॉलिवूड यांच्यात वादाची ठिणगी पडली, दोन्ही बाजूचे फॅन एकमेकांच्या विरोधात ट्विट करत आहेत, हे ट्विटर वार चांगलेच रंगले होते.

 'मिस्टर गावस्कर तुम्ही माझ्या पतीबरोबर माझ नाव घेतलात. अनेक वर्षांपासून तुम्ही खेळाडूंचा वैयक्तीक सन्मान ठेवता, मग आमच्या वैयक्तीक जीवनात असे का? तुम्ही वेगळ्या शब्दात माझ्या पतीवर निशाणा साधू शकला असातात, मात्र माझ नाव घेण योग्य आहे का? 2020 उजाडला तरी माझ्या लाईफमध्ये सर्व गोष्टी सुरळीत झालेल्या नाहीत, मी तुमचा सन्मान करते, तुम्ही क्रिकेटचे लेजंट आहात. तुम्ही माझं नाव कॉमेन्ट्रीमध्ये घेतले तेव्हा माझ्यावर काय प्रसंग आला असेल याची कल्पना करू शकता? असे अनुष्काने खेडेबोल सुनावले.

बॉलीवूडची अभिनेत्री जरीना खानने अनुष्काला समर्थन दिले आणि सुनील गावस्कर यांच्यावर निशाणा साधना. खान म्हणाली, मिस्टर सुनील गावस्कर तुम्ही क्रिकेटचे लेजंट आहात. मिस्टर विराट कोहली आणि त्यांची पत्नी अनुष्का शर्मा यांच्यावर कॉमेंट्री करणे आपणला शोभत नाही,  तुम्ही एक दिग्गज क्रिकेटर होतात, क्रिकेटमध्ये हार- जीत होत असते. खेळाडूने खराब पर्फोमन्स केले तर पत्नीचे नाव घेणे योग्य आहे का? विराट कोहलीने जेव्हा चांगले काम करतो तेव्हा अनुष्काचे नाव घेताना कोणाही दिसत नाही, असे खान यांनी म्हणाली. गावकर यांच्या वक्तव्यामुळे त्यांना कॉमेंट्री पॅनल वरून हटवण्याची मागणी प्रेक्षकांनी केली, सध्या तरी कोणतीही प्रतिक्रिया बीसीसीआयने यावर दिली नाही.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News