ट्विस्ट इन हेअर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 28 August 2019

बसल्यावर तिचा प्रश्न असतो, ‘मॅम, कोणता कट करू, लेअर की स्टेप्स?’ आणि तुमच्या सर्व स्वप्नांवर पाणी फिरतं. दरवर्षी बदलणाऱ्या हेअरकट स्टाईल्सबद्दल तुम्हाला स्वतःहून ब्युटीशियनला सांगावं लागतं. त्यासाठी ‘हेअरकट सज्ञानता’ हवीच...

बसल्यावर तिचा प्रश्न असतो, ‘मॅम, कोणता कट करू, लेअर की स्टेप्स?’ आणि तुमच्या सर्व स्वप्नांवर पाणी फिरतं. दरवर्षी बदलणाऱ्या हेअरकट स्टाईल्सबद्दल तुम्हाला स्वतःहून ब्युटीशियनला सांगावं लागतं. त्यासाठी ‘हेअरकट सज्ञानता’ हवीच...

ए के दिवशी खुशीत तुम्ही ब्युटीपार्लरमध्ये शिरता. वर्षभर मेहनतीने वाढविलेल्या केसांना कात्री लावायची हीच ती वेळ, हे तुम्ही ठरविलेलं असतं. डोळ्यांसमोर कतरिना, दीपिकापासून एमा वॉटसनपर्यंत प्रत्येकीचे हेअरकट येऊन गेलेले असतात आणि मग तुम्हीही ठरवता, ‘आज कुछ हटके ट्राय करेंगे।’ ब्युटीशियनसमोरच्या खुर्चीत बसल्यावर तिचा पहिला प्रश्न असतो, ‘मॅम, कोणता कट करू, लेअर की स्टेप्स?’ आणि तुमच्या सर्व स्वप्नांवर पाणी फिरतं. दरवर्षी बदलणाऱ्या हेअरकट स्टाईल्सबद्दल तुम्हाला स्वतःहून ब्युटीशियनला सांगावं लागतं. त्यासाठी ‘हेअरकट सज्ञानता’ हवीच... ‘आमच्या काळी ना, हे असं नव्हतं,’ आजी काय आईच्या मुखीसुद्धा हे वाक्‍य आलं, की आपल्याला पुराणातल्या गोष्टी ऐकाव्या लागणार, याचा अंदाज 
यायला लागतो. एरवी ‘तुमचा काळ गेला,’ असं त्यांना ठणकावून सांगणाऱ्या आपण हेअरकटच्या बाबतीत मात्र अजूनही त्यांच्याच काळातील स्टेप कट, लेअर कटवरच अडकलेलो आहोत. आता मात्र हेअरकट्‌सच्या यादीमध्ये नवी नावं नोंदवायची वेळ आली आहे.

बॉबकट
तुम्हाला शॉर्ट हेअर आवडत असतील, तर यंदाच्या हेअरकट ट्रेंड्‌समधील बॉबकट हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. चेहऱ्याच्या लांबीचे केससोबत फ्रिंजेस किंवा बॅंग्स हे बॉबकटचं समीकरण आहे; पण यात तुमच्या चेहरेपट्टीनुसार बरेच बदल करता येतात. तुमचे केस नैसर्गिकरीत्या सरळ असतील किंवा हेअर स्ट्रेटनिंग केलं असेल, तर ‘ब्लंट बॉब’ कट करता येईल. यात केस एकाच लांबीत कापले जातात. केसांना वेव्हस्‌ असतील तर बॉबकटमध्ये थोडे लेअर देऊन ‘अँगल बॉब’ करता येतो. एरवी आपण फ्रिंजेस छोटे आणि लांब केस असा लुक करतो. पण त्याऐवजी लांब फ्रिंजेस आणि बाकीचे केस शॉर्ट ठेवून ‘रिव्हर्स बॉब’कट करता येऊ शकतो. बॉबकटसाठी तुमचा चेहरा लहान किंवा मध्यम आकाराचा हवा. वर्तुळाकार चेहरेपट्टीला हा हेअरकट शोभून दिसतो. पण शॉर्ट हेअर्समुळे मोठा चेहरा अजूनच मोठा दिसू शकतो.

बॅंग्स आणि लेअर्स
पारंपरिक लेअर कट हे बहुतेक हेअरकट्‌सचं मूळ आहे. त्यामुळे त्याला मरण नाही. पण त्यात विविधता नक्कीच आणता येते. एरवी लेअर कटसोबत फ्रिंजेस ठेवले जातात. पण त्याऐवजी यंदा बॅंग्स ठेवून बघा. विशेषतः अर्ध्या कपाळाच्या लांबीचे ‘बेबी बॅंग्स’ सध्या ट्रेंडमध्ये आहेत. केसांना वरून लेअर देण्याऐवजी मधल्या भागापासून लेअर देण्यास सुरुवात करा. ‘लाँग लेअर’च्या या प्रकाराने केसांची लांबी जास्त दिसण्यास मदत होते. तसेच संपूर्ण केस एका लांबीचे ठेवून केवळ टोकाकडे लेअर दिलेला ‘सॉफ्ट अंडरकट’ पण यंदा ट्रेंडमध्ये आहे. यंदा मानेच्या खाली पण बस्टलाईनच्या वर असलेली ‘मिडलेंथ कट’ लांबी पसंत केली जातेय.

पिक्‍सल कट 
तुम्हाला संपूर्ण मेकओव्हर हवा असेल, तर पिक्‍सल कट हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. ‘बॉयकट’च्या पठडीतला हा कट दिसायला स्मार्ट दिसतोच; पण त्याची हेअरस्टाईलिंगची खटपटसुद्धा फारशी नाही. कितीही विस्कटलेले केस असले, तरी त्यात सुंदर दिसतात. एमा वॉटसनचा पिक्‍सल कट मध्यंतरी बराच गाजला होता.

क्‍लासी हेअरकलर्स
हेअरकट्‌समध्ये ट्‌विस्ट आणायचा असेल, तर हेअरकलरिंगचा तडका हवाच. यंदा क्‍लासी हेअरकलर्स ट्रेंडमध्ये आहेत. फारसे डोळ्यात न भरणारे, नॅचरल लूकचे पण किंचित स्पाईस भरणारे हे हेअरकलर्स कॉलेज आणि ऑफिसमध्येही सहज मिरविता येतील. बहुतेक भारतीय स्त्रियांचे केस गडद ब्राऊन असतात. त्यात किंचित ‘कॅरमल टच’ देऊन केसांचा बाऊन्स वाढविता येतो. ‘हनी टू डार्क ब्राऊन’ शेडमधील हायलाईट्‌स हा सीझन गाजवाताहेत. एकाच रंगाच्या तीन-चार शेड्‌स घेऊन केलेला डार्क- टू लाईट ‘ओम्ब्रे’ लुक यंदा ट्रेंडमध्ये आहे. केसांना स्ट्रेटनिंग असल्यास हा लुक अजूनच शोभून दिसेल. 

हेअरकट कुठे करावा?
चांगला हेअरकट हे ब्युटीशियनच्या कौशल्यावर अवलंबून असते. कित्येकदा लोकल ब्युटीपार्लरमध्ये ब्रॅंडेड सलूनपेक्षा उत्तम हेअरकट करून मिळतो; पण या ट्रेंडी हेअरकट्‌ससाठी ब्रॅंडेड सलूनची वारी करणं उत्तम ठरू शकतं. तुमची नेहमीची ब्युटीशियन हे नवे हेअरकट्‌स करू शकत असेल. ब्रॅंडेड सलूनमध्ये साधारणपणे ५०० ते १००० रुपयांमध्ये हे हेअरकट करून मिळतील. हेअर कलरिंगचा खर्च ५००० रुपयांपर्यंत येऊ शकतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News