बारावीच्या निकालात नालासोपाऱ्यातील जुळया बहिणींनी मारली बाजी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 17 July 2020
  • काल १६ जुलै रोजी महारष्ट्र बोर्डाच्या बारावी इयत्तेचा निकाल जाहीर करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील बारावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे.
  • सर्व विभागीय मंडळातून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींचा निकाल हा ९३.८८ टक्के असून विद्यार्थी म्हणजेच मुलांचा निकाल ८८.०४ टक्के इतका आहे.

मुंबई :  काल १६ जुलै रोजी महारष्ट्र बोर्डाच्या बारावी इयत्तेचा निकाल जाहीर करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील बारावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. सर्व विभागीय मंडळातून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींचा निकाल हा ९३.८८ टक्के असून विद्यार्थी म्हणजेच मुलांचा निकाल ८८.०४ टक्के इतका आहे. त्यामुळे यावर्षीच्या निकालांप्रमाणे विद्यार्थिनींचा निकाल हा विद्यार्थ्यांपेक्षा ५.८४ टक्क्यांनी अधिक आहे.
 
मुंबईतील नालासोपारा ह्या भागात राहणाऱ्या अक्षता आणि आकांक्षा या दोन जुळयाबहिणींनी दहावी प्रमाणेच बारावी परीक्षांमध्ये देखील ९० हून अधिक टक्के मिळवून यश संपादन केले आहे. ठाकूर कुटुंबातील ह्या दोन्ही मुली नाना पाटील हॉली क्रॉस शाळेत शिकत असताना त्यांनी २०१८ साली दहावीच्या परीक्षेतही ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवले होते. दहावीच्या परीक्षेत अक्षता हिने ९५.८० टक्के तर आकांक्षाने ९५. २० टक्के गुण प्राप्त केले होते. ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवण्याची परंपरा त्यांनी बारावीच्या परीक्षेतही कायम राखली.
 
अक्षता आणि आकांक्षा ठाकूर ह्या दोन विद्यार्थीनींनी वर्तक कॉलेजच्या विज्ञान शाखेत इयत्ता बारावीची परीक्षा दिलेली असून आकांक्षा ने ९२.९२ टक्के तर अक्षताने ९०.७६ टक्के मिळवले आहेत. तसेच आकांक्षा ठाकूर हिने गणित विषयात १०० पैकी १०० मार्क मिळवून आपण अव्वल असल्याचे दाखवून दिले आहे. या जुळ्यामुलींनी मिळवलेल्या घवघवीत यशामुळे ठाकूर कुटुंबीय आणि नातेवाईकांना त्यांचा अभिमान वाटत आहे. पुढील भविष्यात आर्किटेक्ट व्हायची इच्छा आकांक्षाने व्यक्त केली तर अक्षताने बीएससी करून पुढे यूपीएसईची परीक्षा द्यायचे ठरवले आहे.
 
२०२० मध्ये राज्याचा बारावी परीक्षेचा निकाल हा ९०.६६ टक्के लागला असून मागील वर्षाच्या तुलनेत निकालाची टक्केवारी ४.७८ टक्क्यांनी वाढली आहे. २०१९ मध्ये राज्याचा बारावीचा निकाल हा ८५. ८८ टक्के इतका लागला होता. यावर्षी सर्व विभागीय मंडळांमधून नियमित विद्यार्थ्यांमध्ये कोकण विभागाचा निकाल  अव्वल असून त्यांची टक्केवारी ही ९५. ८९ टक्के इतकी आहे. तर मुंबई विभागाची टक्केवारी ही ८९. ३५ असून ती राज्यात सातव्या स्थानी आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News